30 C
Panjim
Sunday, April 2, 2023

सिंधुदुर्गात शिवसेनेचा घोडेबाजाराचा प्रयत्न फसला, जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष नारायण राणे यांनी राखली पंचवीस वर्षाची सत्ता

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. भाजपाच्या संजना सावंत या 30 मते मिळवत विजइ झाल्या आहेत. तर शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना 19 मध्ये पडून त्या पराजित झाल्या आहेत. शिवसेनेने या निवडणुकीत घोडेबाजाराचा प्रयत्न केला होता. मात्र जिल्ह्यात तळ ठोकून असलेल्या भाजप नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी भाजपाचे सदस्य फुटणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली होती. यामुळे घोडेबाजाराचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेचा मिशन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हा प्लॅन पूर्णतः फसला आहे. हा विजय भाजपा नेते नारायण राणे यांच्यावरील कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठतेचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

निवडणुकी पूर्वी जिल्हा परिषद इमारतीत होते तणावाचे वातावरण

सकाळच्या सत्रात दोन्ही गटातील उमेदवार आणि त्यांचे सहकारी सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांच्या जवळ दोन्ही उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दोन्ही बाजूच्या सभासदांना आणि उमेदवारांना प्रत्यक्ष मतदानासाठी पाचारण करण्यात आले. या वेळी सुरुवातीला भाजपाचे उमेदवार सदस्य आणि कार्यकर्ते जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या दारातच अडविले व केवळ सदस्यांना आत प्रवेश करायला परवानगी दिली. यावरून भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतापलेत. काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. यानंतर काही मिनिटातच या ठिकाणी दाखल झालेल्या शिवसेना सदस्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीवर आक्षेप घेतला. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले.

विजयानंतर भाजपाची घोषणाबाजी, पुन्हा झाले वातावरण तंग

या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार संजना सावंत यांना 30 मते पडली, तर शिवसेनेचा उमेदवार वर्षा कुडाळकर यांना 19 मते पडली. भाजपाचा उमेदवार विजयी होताच निवडणूक कक्षाच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र जमत शक्तिप्रदर्शनही केले. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे सदस्य निवडणूक कक्षातून बाहेर येत असताना भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही काळ वातावरण चांगले तंग झाले होते. परंतु या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाजपा कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताच समोरून भाजपा आमदार नितेश राणे आले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तापले होते. परंतु भाजपा कार्यकर्त्यांनी विजयाच्या आनंदाला गालबोट लागू दिले नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाज्यात आमदार नितेश राणे यांना उचलून घेत विजयोत्सव साजरा केला.

हा विजय नारायण राणे यांच्यावरील कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठतेचा

शिवसेनेने जिल्हा बँकेचा वापर करत या निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्यावर निष्ठा असलेल्या आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या भाजपाच्या सर्व सभासदांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. हा विजय कार्यकर्त्यांच्या नारायण राणे यांच्यावरील एकनिष्ठतेचा आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. शिवसेनेने कितीही प्रयत्न केले तरी नारायण राणे यांना शिवसेना आव्हान देऊ शकत नाही. हे या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे असेही ते म्हणाले. आमच्या सभासदांना फोडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. अखेरपर्यंत शिवसेनेचे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत आणि यापुढे देखील होणार नाहीत. जिल्हा परिषदे नंतर आत्ता जिल्हा बँकेवर भाजपाचे कमळ फुलेल. असा विश्वास देखील आमदार नितेश राणे यांनी या वेळी व्यक्त केला आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles