सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पाऊस.. ग्रामीण भागांमध्ये वादळी वारे आणि पावसाने केले नुकसान.. समुद्रात वादळ सदृश परिस्थिती, परराज्यातील नौका देवगड बंदरात आश्रयाला..

0
157

 

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. या परतीच्या पावसाने दणादण उडवली असून गेले दिवसापासून पावसाने झोडपून काढले. तसेच वातावरणही ढगाळ होते. ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे पडझड होऊन लाखो रुपयांची नुकसानी झाली. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे मध्यरात्री वीज खंडित झाली.

मध्यरात्री बारा वाजता व पहाटे ४ वाजता सावंतवाडी शहरातील वीज खंडित झाली होती. ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचे तीन तेरा वाजले होते. या वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या धुवांधार पावसामुळे गेले दोन दिवस वीज खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोलगाव, बांदा, माडखोल, सांगली भागात वीज वितरणचे पोल तुटून, वायर तुटणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज वितरण ते जवळपास दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. निगुडे मधलीवाडी येथील रामदास काशिनाथ नाईक यांच्या घरावर सागाचे झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले आहे. तर आजगांव भोमवडी येथील भिकाजी पांडुरंग मालजी यांच्या मांगरावर काल शुक्रवारी रात्री माड पडून अंदाजे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. असे जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान वादळी वाऱ्यासह पडत असल्या पावसाने सावंतवाडी तालुक्यात झाले आहे. आंबोली, इन्सुली घाटात झाड पडले होते. ते झाड सार्वजनिक बांधकाम, वन
विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दूर केल्याने वाहतूक सुरळीत झाली. दिवसभरात तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. पडत असलेल्या धुवाधार पाऊस व वादळी वाऱ्यासह सावंतवाडी तालुक्यात भात शेती पिकली आहे. त्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे कृषी विभागाने स्पष्ट केले. वीज वितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता के. एच चव्हाण यांनी दिली.

देवगड बंदरात परराज्यातील नौका दाखल.

वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून देवगड बंदरात हजारो मच्छीमार नौका दाखल झाले आहेत ,सर्वांत सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदरकडे पाहिलं जातं .यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राज्यातील नौकांचा समावेश आहे.समुद्रात वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की हजारो मच्छिमारी नौका देवगड बंदरात दाखल होतात.

29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर पर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने व ढगाळ वातावरण असल्यामुळे देवगड बंदरामधील कर्नाटक केरळ तामिळनाडू व स्थानिक नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाले आहेत देवगड बंदर हे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बंदर असून अनेक वेळा मोठमोठी वादळ झाली. त्यावेळी देवगड बंदरामध्येच अनेक राज्यातील नौकांनी आश्रय घेतला होता हवामान खात्याचा आदेश आल्यानंतर प्रत्येक वेळी देवगड बंदरामध्ये सुरक्षितेसाठी आजही नौका दाखल होत आहेत.

तर दोडामार्ग तालुक्यतील पणतुर्ली शाळेचीवाडी येथे वसंत गवस यांच्या घरा शेजारील सार्वजनिक विहीर परतीच्या एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे खचली आहे. यात अंदाजे १५ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पणतुर्ली शाळेची वाडी पिण्याच्या पाण्यासाठी याच विहिरीवर अवलंबून होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी लवकरात लवकर ही विहीर बांधून मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती पणतुर्ली – परमे ग्रामपंचायत सरपंच प्रथमेश मणेरीकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here