सिंधुदुर्गात गेली चार वर्षे खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांना घरचा रस्ता

0
311

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनोख्या फतवा काढलाय त्यामध्ये गेली चार वर्ष १५ व्या वित्त आयोगातील प्राप्त निधी खर्च न केलेल्या ग्रामसेवकांवर कडक कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करण्याचा बडगा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वीच ४ ग्रामसेवकांना निलंबित केल्यावर वैभववाडी तालुक्यातील हेत आणि देवगड तालुक्यातील पडेल येथील ग्रामसेवकांना निलंबित केले आहे.

ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात आणि या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात वित्त आयोगाच्या माध्यमातून थेट निधी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा निधी खर्च होताना दिसत नाही. याची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी घेतली असून, खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या सन २०२०/२१ तसेच २०२१/२२ या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त निधी या ग्रामसेवकांनी अद्याप खर्च केला नाही. तब्बल चार वर्ष होऊन गेली तरीही केवळ ७ किंवा ८ टक्के एवढाच खर्च संबंधित ग्रामसेवकांनी केला आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या खर्चासंदर्भात बोलाविलेल्या बैठकांनाही हे ग्रामसेवक उपस्थित राहिले नाहीत.

त्यामुळे जिल्ह्यातील अशा एकूण सहा ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी निलंबित केले आहे. या ६ पैकी ४ ग्रामसेवकांना दोन दिवसांपूर्वीच निलंबित केले होते. तर गुरुवारी वैभववाडी तालुक्यातील हेत या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी कांबळे आणि देवगड तालुक्यातील पडेल या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी व्ही कांबळे यांना निलंबित केले आहे. तर दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी शोभा सावंत, मळेवाड ग्रामसेवक सोमा राऊळ, दोडामार्ग तालुक्यातील बोडदे ग्रामसेविका सुजाता जगताप तसेच मांगेली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक लिंगाप्पा नाईक यांना निलंबित केले होते.

तळवडे ग्रामसेवक मोठ्या कारवाईच्या उंबरठ्यावर ग्रामपंचायत मध्ये असलेल्या विविध योजनांमधून कोणताही खर्च न करता लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नामदेव तांबे हे निलंबित असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर चौकशी अंती मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here