28 C
Panjim
Tuesday, December 6, 2022

सिंधुदुर्गात कोरोनाचा संसर्ग वाढला, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांत हजार रुग्ण मिळाले. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ 30 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालय, तायशेटे रुग्णालय, महिला रुग्णालय व गृहरक्षक दल कार्यालय याठिकाणी नव्याने 202 बेडची व्यवस्था करण्यात आली. मालवण येथील झाट्ये रुग्णालयात कोविड सेंटरला परवानगी देण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

सामंत यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांची 15 दिवसांच्या निर्बंधांबाबत बैठक घेतली. जिल्ह्यातील टास्क फोर्स व खासगी डॉक्‍टरांचीही बैठक घेतली. यानंतर त्यांनी झूमच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. या वेळी खासदार राऊत यांनीही आपली भूमिका विशद केल्याचे सामंत यांनी सांगितले.

नामवंत डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याचे दिले आश्‍वासन

ते म्हणाले, पडवे येथील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयात 50, तर तायशेटे हॉस्पिटलमध्ये 12 बेड घेतले आहेत. कुडाळ येथील महिला हॉस्पिटलमध्ये 70, तर गृहरक्षक दल कार्यालयात 65 बेड केले. जिल्ह्यातील नामवंत डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आमदार नाईक यांनीही आपले परिचारिका महाविद्यालय कोविड सेंटरसाठी दिले. आपण भाजप जिल्हाध्यक्ष तेली यांना अन्य कोणत्या सुविधा आपल्या पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होतील, याची विचारणा करीत अधिकाधिक सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिकचा 30 टक्के निधी कोरोनासाठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिकचा 30 टक्के निधी कोरोनासाठी वापरण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या 170 पैकी 51 कोटी रुपये वापरता येणार आहेत. यातून अधिकाधिक आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील परिचारिका महाविद्यालयाचे विद्यार्थी, नवीन डॉक्‍टर व निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात सेवा द्यावी. त्यांना मानधन दिले जाईल, असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्ह्याला 10 हजार कोरोना लस उपलब्ध

उदय सामंत म्हणाले, जिल्ह्याला 10 हजार कोरोना लस उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य संचालक अर्चना पाटील यांना जिल्ह्याची लोकसंख्या व बाधित रुग्णसंख्या याचा विचार करून जास्तीत जास्त लस देण्यास सांगितले. खासगी डॉक्‍टरांनी सेवा देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे वेळापत्रक तयार करून खासगी डॉक्‍टरांची सेवा घेतली जाईल. जुने कोविड सेंटर दोन दिवसांत पुन्हा सुरू केले जातील. दुसऱ्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांना कोरोना चाचणी करून दाखल करावे.

भाजपा नेते खासदार नारायण राणेंना दूरध्वनी करणार

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयात अजून बेड मिळावे, त्या हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी रोटेशन पद्धतीने कोरोना रुग्णांना सेवा द्यावी, यासाठी मी या हॉस्पिटलचे संस्थापक खासदार नारायण राणे यांना दूरध्वनी करणार असल्याचे सामंत यानी सांगितले. सध्याचे दिवस राजकारण आणि टीका करण्याचेही नाहीत. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आहेत. महिनाभर सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. राजकारण नंतर करूया. चुकत असल्यास सांगावे. तुमच्या सल्ल्याने कोरोना जात असल्यास मी ते करायला तयार आहे. बैठक घेण्यास तयार आहे; पण सध्या राजकारण नको, अशी भावनिक हाकही पालकमंत्री सामंत यांनी विरोधकांना दिली आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles