23 C
Panjim
Saturday, May 21, 2022

सिंधुदुर्गात आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ४२ जणांवर गुन्हे दाखल भाजपा कार्यकर्त्यांची चक्काजाम प्रकरणी धरपकड

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ येथे शनिवारी भाजपाने चक्का जाम आंदोलन करत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. म्हणून हि कारवाई करण्यात आली आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळावे यासाठी भाजपाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन केले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात बेकायदेशातीर केलेल्या कृत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्या एकूण ४२ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्यातील सामाजिक घडी विस्कटण्याचे काम ठाकरे सरकारने केले असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चक्काजाम आंदोलनावेळी केला.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर हे आरक्षण टिकवण्यामध्ये ठाकरे सरकार अपयशी झाले म्हणून ठाकरे सरकार विरोधात भाजपच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले की न्यायालयांमध्ये मराठा समाजाचे आरक्षण देऊ शकले नाही. तसेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला सुद्धा स्थगिती देण्यात आली. धनगर समाजही अस्वस्थ आहे. ही सामाजिक घडी विस्कटण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. असा आरोप करून ओबीसी राजकीय आरक्षणाविरोधात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य गेले म्हणजेच या सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना आरक्षण द्यायचे नाही असे त्यांनी सांगून यापुढे ही लढाई अशीच चालू राहील असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विरूद्ध भा.द.वि. सं. कलम 143, 149, 341, 188, 269, 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या भाजप सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण ४२ जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजपा गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img