सिंधुदुर्गात आज नवा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 17 वर जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली माहिती

0
120

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत जात आहे. शनिवारी एका दिवशी 8 रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा एक रुग्ण सापडला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या 17 झाली आहे.

हा रुग्ण कुडाळ तालुक्यातील असून ही 52वर्षीय महिला कोरोना बाधित आहे. 17मे रोजी सदर महिला मुंबई येथून जिल्ह्यात आली. 20 मे रोजी तिचा स्वाब तपासणी साठी घेतला. आज रविवारी तिचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामूळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या 17झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. सदर महिला आल्यापासून अलगिकरनात होती असेही त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here