सावंतवाडी शहरात चुकीची खोदाई झाल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाई करणार मुख्याधिकारी संचिता महापात्रा यांची माहिती

0
180

सिंधुदुर्ग – जिओ कंपनीकडुन खोदण्यात आलेला रस्ता येत्या दोन ते तीन दिवसात डांबरीकरण करण्यात येणार आहे. कंपनीला एकाच बाजूने खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्याकडुन नियमांचा भंग झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहीती पालिकेच्या मुख्याधिकारी संचिता महापात्रा यांनी आज येथे दिली.

दरम्यान या ठिकाणी विज वाहिन्या तसेच गॅसची पाईपलाईन अंंडरग्राउंड करण्याबाबत अद्याप तरी प्रस्ताव नाही. संबधित गॅस कंपनीला दर पटलेले नाहीत तर विज कंपनीचे पैसे परत गेले आहेत.

त्यामुळे तुर्तास तरी पुन्हा रस्ता खोदला जाणार नाही, असे त्या म्हणाल्या. शहरात खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यावरुन शहरात नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत सर्वपक्षीयांनी महापात्रा यांना जाब विचारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहीती दिली.

त्या म्हणाल्या, या ठिकाणी स्थायी समितीने दिलेल्या परवागनी नुसारच शहरात खोदाईचे काम सुरू आहे. मध्यंतरी दिवाळीचा हंगाम असल्यामुळे त्यावेळी काम करु नये, अशी नागरीकांची मागणी होती. मात्र आता पुन्हा एकदा काम सुरू करण्यात आले आहे.

दोन्ही बाजूने रस्ता खोदण्यात आला,असे नागरीक व लोकप्रतिनीधींचे म्हणणे असेल तर आम्ही त्याबाबत नक्कीच खात्री करणार आहे. संबधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोणाची गय केली जाणार नाही.

गेले काही दिवस सुरू असलेल्या कामावर मी स्वतः नजर ठेवून आहे. चुकीच्या पध्दतीने काम होवू देणार नाही. खोदण्यात आलेले रस्ते तात्काळ बुजवून त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याचा आराखडा होता. मात्र मध्येच अवकाळी पाउस दाखल झाल्यामुळे त्यात काही अडसर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here