सावंतवाडीतील शिरशिंगेतील गावातील तरुणाची आत्महत्या; अनेकजण हळहळले.

0
224

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये धक्कादायक घटना घडली असून जिल्ह्यातील तरुणांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामीण भागामध्ये रहाणाऱ्या एका तरुणाने धक्कादायक मॅसेज मित्राला पाठवून आपण आयुष्य सपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आयुष्यात स्ट्रगल करणे खूप कठीण आहे, तसे माझ्या घरातील लोकांना समजावून सांग असा आपल्या खास मित्राला मॅसेज पाठवून शिरशिंगे वीरवाडी येथील २२ वर्षीय युवकाने माजगाव येथे भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. साहिल सुनिल राऊळ (मुळ रा. शिरशिंगे) असे त्याचे नाव आहे. तो चार दिवसांपुर्वी माजगाव येथे रहायला होता.याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावामध्ये राहणाऱ्या साहिल याने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. ४ दिवसापुर्वी तो माजगाव उद्यमनगर येथील एका कंपनीत अपरेटिस म्हणून काम करीत होता. तर सायंकाळच्या वेळेत शहरातील एका चायनिज कॉर्नर मध्ये काम करीत होता. दरम्यान गेले काही दिवस त्याला नैराश्य आले होते. काल दुपारी त्याचा मित्र सुंदर सिताराम राऊळ याला त्याने काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मला आयुष्यात स्ट्रगल करणे कठीण आहे ते माझ्या घरातील लोकांना समजावून सांग, असा मॅसेज पाठविला. यावेळी सुंदर याने त्याला नेमके काय झाले? हे विचारण्यासाठी पुन्हा फोन केला. परंतू त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याला संशय आला. त्यामुळे त्याने तात्काळ याबाबतची माहिती आपला भाऊ न्हानू याला दिली आणि ते शिरशिंगे येथून माजगाव येथे आले. यावेळी त्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत जावून त्यांनी पाहणी केली असता साईल याचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार हवालदार हनुमंत धोत्रे व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साईल याच्या पश्चात आई, वडिल असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here