26.3 C
Panjim
Saturday, December 3, 2022

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याची कसून चौकशी करा व आरोपी पकडा

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून हल्ल्या केल्याची शक्यता आहे.तशी सर्वत्र चर्चा आहे. या हल्ल्याचा आम्ही भाजपच्या वतीने निषेध करतो. मात्र या हल्ल्याची कसून चौकशी करावी तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनाही पोलिसांनी सुरक्षा पुरवावी अशी मागणी कणकवली तालुका भाजपच्यावतीने पोलीस निरीक्षक सचिन हूंदळेकर याच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

यावेळी सभापती मनोज रावराणे,नगरसेवक अण्णा कोदे,संदीप मेस्त्री,नगरसेवक शिशिर परुळेकर,प्रकाश सावंत बाबू गायकवाड, मेघा गांगण,प्रज्ञा ढवण, गणेश तळगावकर,संतोष पुजारे,विठ्ठल देसाई, प्राची कर्पे, संजना सदडेकर,सदा चव्हाण,प्रशांत सावंत,नितीन पाडावे, सर्वेश दळवी आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते श्री . संतोष परब यांच्यावर अज्ञाताकडून कणकवली येथे प्राणघातक हल्ला झाला असून सदर हल्ला राजकीय वादातून झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे . या हल्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत . परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील शिवसेनेचे नेते मंडळींबरोबर फिरत असलेले काही लोक है हिस्ट्रीशीटर असून त्यांनीच हा हल्ला केला असण्याची दाट शक्यता आहे व त्याचे खापर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे . सद्या सिंधुदुर्ग जिल्हयात निवडणुकांचा प्रचार सुरू आहे आणि या निवडणुकांमध्ये जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीच अशाप्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची नावे गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे . श्री . संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा आर्थिक देवाणघेवाणीतूनच झाला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे . सदर घटनेचा भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका निषेध करीत आहोत . तसेव सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री . सतीश सावंत यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होईपर्यंत पोलिस संरक्षण देण्यात यावे . तरी श्री . संतोष परब यांच्यावर ज्याठिकाणी हा हल्ला झाला तेथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून कारवाई करा अशी मागणी यावेळी भाजपाच्या वतीने करण्यात आली .

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles