शिरोडा वेळाकर समुद्रात एका पर्यटकाचा बुडून मृत्यू

0
138

सिंधुदुर्ग: जिल्हा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी शिरोडा वेळागर या बीचचा नेहमी आकर्षण असतं. शिरोडा वेळागर या समुद्रकिनारी गोवा, कोल्हापूर ,कर्नाटक, नाशिक ,पुणे, मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येत असतात याचं कारण म्हणजे शिरोडा वेळागर हे अगदी गोवा राज्याला लागून असल्यामुळे गोव्यातील ही गोव्यात येणारे जे पर्यटक आहे ते पर्यटक शिरोडा वेळागर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर कायम येत असतात. तसेच या शिरोडावेळागर समुद्रकिनारी विदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असल्यामुळे स्थानिक पर्यटक आणि किंवा जिल्ह्याबाहेरील पर्यटकांचा ओघ या बीचवर अधिक असतो. मात्र या समुद्रकिनारी पर्यटकांचा अधिक ओग असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. या बीचवर अनेक अति उत्साही पर्यटक खोल समुद्रामध्ये जात असतात त्यामुळे अनेक पर्यटकांचा जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,शिरोडा- वेळागर येथे समुद्रात आंघोळ करत असताना कोल्हापूर-कागल येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. अवधूत हरिभाऊ जोशी (वय ३९,) असे त्याचे नाव आहे. शिवविच्छेदन करून वेंगुर्ले पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

कागल येथून मयत व त्याचे ५ मित्र शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आले होते. यावेळी समुद्रात आंघोळ करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या बाबत माहिती मिळताच पोलीस गजेंद्र भिसे आणि पोलीस योगेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबतची खबर सिद्धार्थ मधुकर लोखंडे रा. सम्राटनगर-कोल्हापूर यांनी शिरोडा पोलिसात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here