शरदचंद्र पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्याकडून शुभेच्छा

0
85

 

कणकवली – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरचंद्र पवार यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी त्यांना दिर्गयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले शरद पवार यांनी देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासाला एक नियोजनबद्ध गती दिली आहे. देशाच्या कृषी धोरणात त्यांचा वाटा मोठा आहे. बारामती सारखा एकेकाळचा पडीत जमीन क्षेत्र मोठे असलेला आणि दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आज कृषी क्रांतीने बहरला आहे. यामागे केवळ शरद पवार यांची दूरदृष्टी आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार यांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला समाजात प्रतिष्ठेची ओळख देताना राजकारणातूनही सामाजिक कार्याची शिकवण दिली आहे. राजकारण आणि समाजकरणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक ठसा उमटवला आहे. कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, शांतपणा, विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा अन्‌ दूरदृष्टी या व्यक्तीमत्त्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांची आजवरची वाटचाल घडली आहे. असेही ते म्हणाले.

दरम्यान त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमातून त्यांना दीर्घायुषी होण्यासाठी प्रार्थना करावी असे आव्हाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here