28.4 C
Panjim
Tuesday, May 17, 2022

वेंगुर्ले- मठ परिसरात चक्रीवादळाचा फटका झाडे, विजेचे पोल रस्त्यावर; घराची कौले गेली उडून

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – परतीच्या पावसाने आज मठ परिसरात जोरदार धुमाकूळ घातला. अचानक दाखल झालेल्या चक्रीवादळामुळे परिसरातील झाडे आणि विजेचे पोल तुटून पडले, तर काही ठिकाणी घराची कौले उडून गेली.

यात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती तहसीलदार नागेश शिंदे यांनी दिली. दरम्यान अचानक दाखल झालेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनचे नुकसान होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्याकडून वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे घरोघरी होणाऱ्या तुलसी विवाहात सुध्दा पावसाचे व्यत्यय आले आहे.
तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट करत मुसळधार पाऊस सुरू झाला. तुळशी विवाह असल्याने बाजार पेठेत चुरमुरे व लग्नासाठी लागणारे साहित्यांची दुकाने सजली होती.

तर घरोघरी तुळशी विवाहासाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. मात्र अचानक पाऊस आल्याने सर्वांची तारांबळ उडाली आणि जनजीवन विस्कळित झाले आहे.

दरम्यान मठ येथे मुख्य रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिरोडा वेंगुर्ला येथून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसेस मठ येथून परतून दाभोली मार्गे नेण्यात आल्या आहेत.

झाडे तोडून रस्ता मोकळी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नायब तहसीलदार नागेश शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img