वेंगुर्लेतील तौक्ते चक्रीवादळात नुकसानग्रस्तांना ८ कोटी ९ लाख ३०० रुपये भरपाई

0
94

 

सिंधुदुर्ग – १६ मे २०२१ रोजी झालेल्या तौक्ते चक्रीवादळात झालेल्या वेंगुर्ले तालुक्यासाठी नुकसाग्रस्तांसाठी शासनाकडून ८ कोटी ९ लाख ३०० रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असून या रकमेतून संबंधित कृषी, मत्स्य व महसूल विभागामार्फत आलेल्या परिपूर्ण प्रस्तावानुसार संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यात नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यात मत्स्यखाते, मनुष्यहानी, कपडे व भांडी, घर-गोठे व कुक्कुट पालनअंतर्गत १०० टक्के वाटप तर शेतकऱ्यांची कृषी खात्यामार्फत आलेल्या प्रस्तावानुसार ६० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित भरपाई जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.

जिल्ह्यात १६ ते १८ मे २०२१ रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यात कोट्यवधी रूपयांचे नकुसान झाले होते. यात मच्छीमार व शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीचेही मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे प्रस्ताव महसूल, मत्स्यविभाग व कृषि विभाग यांच्यामार्फत करण्यात आले होते. लाभार्थ्यांच्या बँकखात्यात नुकसान भरापाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील नुकसानग्रस्तांसाठी शासनाकडून ८ कोटी ९ लाख ३०० रुपये एवढी नुकसान भरपाईची रक्कम जून २०२१ मध्ये प्राप्त झाली. त्यानुसार मत्स्य व्यवसायासाठी २ कोटी ४४ लाख ९५ हजार एवढे प्राप्त झाले होते. त्यासाठी मत्स्य खात्याकडून आलेल्या प्रस्तावानुसार ५८० लाभार्थांना त्यापैकी २ कोटी २९ लाख ६५ हजाराचे वाटप करण्यात आले. यापैकी उर्वरित राहिलेले १५ लाख ३० हजार हे पुन्हा शासनाकडे जमा केले जाणार आहे.

तसेच शेतपीक शिर्षकाखाली ३ कोटी ४२ लाख ४९ हजार एवढी रक्कम प्राप्त झाली होती. यातील ८६९ लाभार्थ्यांना १ कोटी ८५ लाख ८४ हजार ५५६ रूपये जमा करण्यात आले आहेत. तर उर्वरित लाभार्थ्यांची रक्कम जमा होणार आहे. घर व गोठे या शिर्षकाखाली २ कोटी २० लाख ७५ हजारपैकी २ कोटी १९ लाख २६ हजार ४४६ एवढी रक्कम ८२५ लाभार्थांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. सद्यस्थितीत घर व गोठ्यांच्या नुकसानीची १०० टक्के रक्कम जमा करण्यात आलेली आहे. कुक्कुटपालन शिर्षकाखाली ५ हजार रुपये, मनुष्यहानी, कपडे-भांडी या शिर्षकाखाली ७५ हजार रूपये जमा झाले होते. त्यानुसार ७० हजार रूपये जमा करण्यात आले. तर केरोसिन व अन्नधान्यसाठी प्राप्त झालेले १३०० रूपये हे खर्च पडलेले नसून ते शिल्लक आहेत. अन्य नुकसाग्रस्तांची भरपाई आठ दिवसांत जमा होईल, असे तहसीलदार लोकरे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here