विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा करिश्मा

0
112

कोकण – परदेशातील उद्योगांकडून भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये गेल्या वर्षात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचे समोर आले आह़े राज्यात परदेशी उद्योगांनी एकूण 1 लाख 18 हजार 422 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याने गेल्या वर्षात परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरात व कर्नाटकला मागे टाकले आह़े आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत राज्यातील परकीय गुंतवणूक ४ हजार कोटी रूपयांनी वाढली आह़े

केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) नुकतीच परकीय गुंतवणूकीची आकडेवारी प्रसिद्ध केल़ी यामध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने बाजी मारली आह़े राज्यात गेल्या आर्थिक वर्षात एक लाख 18 हजार 422 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आह़े सेवा ऑटोमोबाईल, कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, दूरसंचार, बांधकाम, औषधनिर्मीती, रसायने या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आह़े

गेल्या वर्षी अमेरिका, जपान, मॉरिशस, नेदरलँड, ब्रिटन, जर्मनी संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर या देशांनी सर्वाधिक गुंतवणूक देशात आणि महाराष्ट्रात केली असल्याचे डीपीआयआयटी ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आह़े गुंतवणूकीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने कर्नाटक व गुजरातला मागे टाकले आह़े कर्नाटकमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षात देशातील सर्वाधिक म्हणजेच सुमारे 1 लाख 63 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक झाली होत़ी त्या पूर्वीच्या वर्षात परकीय गुंतवणुकीमध्ये अव्वल येण्याचा मान गुजरातने पटकावला होत़ा 2020-21 या आर्थिक वर्षात एक लाख 62 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक गुजरातने मिळवली होत़ी

पुणे जिह्यात मोठी गुंतवणूक
गेल्या वर्षभरात पुणे जिह्यात मोठी परकीय गुंतवणूक करण्यात आली आह़े हिंजवडी आयटीपार्प, चाकण, भोसरी आणि रांजणगांव एमआयडीसीमध्ये परकीय करणाऱया उद्योगांनी आपल्या कंपन्यांची सुरूवात केली आह़े

सेवा, संगणक क्षेत्राला सर्वाधिक पसंती
गेल्या वर्षभरात देशात झालेल्या एकूण परकीय गुंतवणूकीपैकी 31 गुंतवणूक सेवा व संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात करण्यात आली आह़े सेवा क्षेत्रात सुमारे 15 टक्के गुंतवणूक झाली असून 16 टक्के गुंतवणूक संगणक सॉफ्टवेअर , हार्डवेअर क्षेत्रात करण्यात आल़ी त्यापाठोपाठ ट्रेडींग (6 टक्के), ऑटोमोबाईल (6 टक्के) दूरसंचार (6 टक्के) अशी गुंतवणूक झाली आह़े
गुंतवणुकीचा पस्ताव आल्यानंतर तो तातडीने मंजूर करण्याचे धोरण ठेवले असून उद्योगांना सवलती दिल्य़ा त्यामुळे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीकत पुन्हा पहिल्या कमांकावर आला आह़े अशी माहिती हर्षदीप कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग) यांनी दिली.

राज्यनिहाय परकीय गुंतवणूकीची आकडेवारी (कोटींमध्ये)
राज्य 2020-21 2021-22 2022-23
महाराष्ट्र 1,19,734 1,14,964 1,18,422
गुजरात 1,62,830 20,169 37,059
कर्नाटक 56,884 1,63,795 83,628
दिल्ली 40,464 60,839 60,119
तामिळनाडू 17,214 22,396 17,247
हरियाणा 12,559 20,971 20,735

उद्योगमंत्री सामंतांनी केली विरोधकांची तोंडे बंद
राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याची टिका उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आली होत़ी मात्र राज्यात सर्वाधिक गुंतवणूक करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दमदार कामगिरी केली आह़े तसेच टिका करणाऱया विरोधकांची तोंडे देखील बंद केल़ी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here