27 C
Panjim
Sunday, May 22, 2022

वायडब्ल्यूए च्या माध्यमातून तरुणांनी हाती घेतलेले काम कौतुकास्पद : डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर वायडब्ल्यूए संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली औषधी वनस्पती लागवड

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

कणकवली – आजच्या काळात पर्यावरण संवर्धन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. युथ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि औषधी वनस्पती लागवडीचे तरुणांनी हाती घेतलेले काम तेवढेच महत्वाचे आहे. असे मत कणकवलीचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी व्यक्त केले.

वृक्ष संवर्धनाचा निश्चय करून वाय डब्ल्यू ए अर्थात युथ वेल्फेअर असोसिएशन ही सामाजिक संस्था काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कणकवलीत उपविभागीय पोलीस कार्यालय, कणकवली उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन आणि वैभववाडी पोलीस ठाणे याठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. नितीन कटेकर बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, या संस्थेने विशेषतः तरुणांचे प्रश्न हाती घेऊन कामाला सुरुवात केली आहे. तरुणांनीच तरुणांसाठी काहीतरी चांगलं करण्याची भावना जोपासणे ही खूप चांगली बाब आहे. युथ वेल्फेअर असोसिएशन जिल्ह्यात पुढच्या काळात नक्कीच मोठं काम करेल. इथले प्रश्न समजून घेताना सामाजिक परिवर्तनाचा महत्वाची भूमिका बजावेल अशी मला खात्री वाटते. या संस्थेच्या सर्वच कार्यकर्त्यांना माझे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम राहील असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या परिसरात डॉ. नितीन कटेकर यांच्या हस्ते औषधी वनस्पती लागवड करण्यात आली. या प्रसंगी कणकवलीचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, पोलीस उप निरीक्षक श्री. लाड, पोलीस हवालदार राकेश कडुलकर यांच्यासह अधिकारी व पोलीस बांधव उपस्थित होते.

कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात यावेळी प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. टाक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी मनोहर परब उपस्थित होते. तर कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात स्टेशन मास्तर श्री. मधुकर, रेल्वे पोलीस निरीक्षक श्री. कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लोट उपस्थित होते.

वैभववाडी पोलीस ठाणे परिसरात पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि ठाणे अंमलदार राजू जामसंडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संबंधित सर्व ठिकाणी चंदन, दालचिनी, रक्त चंदन, सोनचाफा, तुळस, पांढरी जासवंद, अडुळसा अशा विविध 14 प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.

युथ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रुपेश घाडी, सहसचिव रउफ काझी, सह खजिनदार एल्टन नोरोन्हा, सदस्य आणि मार्गदर्शक राजेश बांदिवडेकर, समृद्धी तेजस घाडीगांवकर, कोमल काझी, विवेक ताम्हणकर, पंडित परब आदी उपस्थित होते. यावेळी लागवड केलेल्या झाडांना राखी बांधून सर्वांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img