वायंगणी येथे लागलेल्या आगीत काजू कलमे जळून खाक,सुमारे ७० ते ८० हजाराचे नुकसान शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज ..

0
64

 

सिंधुदुर्ग – वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी कोंडुरावाडी येथे आज रविवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमे जळून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

या आगीत येथील शेतकरी आनंद पेडणेकर यांची ३० काजू कलमे व दाजीबा पेडणेकर यांची २० काजू कलमे जळून नुकसानी झाली आहे.ही आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ संदेश मांजरेकर, रवि मांजरेकर, सर्वेश मांजरेकर,विवेक पेडणेकर, कौस्तुभ पेडणेकर, सागर पेडणेकर, विनायक मांजरेकर, राहुल पेडणेकर व अन्य ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मदत केली.तसेच वेंगुर्ले न.प.च्या अग्निशमन बंब वेळीच दाखल झाल्याने ही आग विझविण्यास मदत झाली.मुख्यतः नजीकच्या क्षेत्रात ही आग गेली असती तर आणखीन मोठे नुकसान झाले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here