वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनला तुफान प्रतिसाद! आणखी आठ डबे वाढवण्याची प्रवाशांची मागणी

1
243

कोकण रेल्वे मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आलेली वंदे भारत सेमी हायस्पीड एक्सप्रेस या गाडीला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आता प्रवासी वर्गाकडूनच ही आठ डब्यांची असलेली गाडी 16 डब्यांची करावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जवळपास 94 टक्के इतका उदंड प्रतिसाद या गाडीला मिळत आहे. राज्यभरात चालवणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस पैकी गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. या मिळणारा मोठा रिस्पॉन्स पाहता या गाडीला आणखी आठ डबे जोडण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे बोर्ड घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसला डबे वाढवण्यासाठीचा मोठा निर्णय हा सर्वस्वी केंद्रीय रेल्वे बोर्डाचा आहे त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालय प्रवाशांच्या या मागणीला आता काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता या गाडीचे डबे वाढवण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे बोर्ड घेणार का याकडे अनेक प्रवाशांचे लक्ष लागून राहिला आहे.

पूर्णपणे एसी असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस मधून होणारा आरामदायी प्रवास लार्जेस्ट विंडो,ऑटो सिस्टम डोअर, मुव्हींग चेअर्स आधी अत्याधुनिक सुविधांमुळे ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. पुढील काही महिन्याचे बुकिंगलाही प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस ही आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. मानसून वेळापत्रक नंतर ही गाडी शुक्रवार वगळता दररोज कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. प्रवासी व पर्यटकांबरोबरच कोकण ते मुंबई असा अनेकदा प्रवास करणारे अनेक अधिकारी कर्मचारी यांच्याही ही सुपरफास्ट असलेली वंदे भारत एक्सप्रेस पसंतीस उतरली आहे

विशेष म्हणजे या गाडीला सी एस एम टी येथून सुटल्यावर दादर, पनवेल, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात केवळ खेड व रत्नागिरी येथे थांबा देण्यात आला आहे.या दोन्ही स्टेशनवरही या गाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाचे बुकिंग या गाडीचे फुल झाले आहे आणि प्रवासी वेटिंग वरती आहेत इतका उदंड मिळणारा प्रतिसाद पाहता गाडीला डबे वाढवण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे बोर्ड घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र तूर्तासतरी असा कोणताही प्रस्ताव मध्य रेल्वे किंवा कोकण रेल्वे प्रशासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

1 COMMENT

  1. # security of the commuters is more crucial than the speed travelling.

    This has been always the issue with this BJP government.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here