लोकसभा निवडणुक : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सिंधुदुर्गात पहिला गुन्हा दाखल आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह ८ -१० जणांवर गुन्हा दाखल

0
44

 

कणकवली – आपचे राष्ट्रीय अध्यक्ष ,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह ७ ते १० जणांच्या जमावाने दुपारी १ वाजता कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घोषणा देत निषेध केला.जमावबंदी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह ७ – ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यात आदित्य बटवाले, मंगेश दळवी, मिलि मिश्रा ( कुडाळ,) प्रमोद जाधव तरंदळे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर ( कणकवली ) शरद खरात ( कुडाळ ) आदींसह ८ ते १० जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असून जमावबंदी चे पालन सर्वांनी करावे असे आवाहन कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here