लपून बसलेल्यांनी संघर्षाची भाषा करू नये – भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

0
91

सिंधुदुर्ग – गेले तीन टर्म आमदार असलेल्या दीपक केसरकर हे आज पर्यंत कोणत्याही रोजगारावर बोलताना दिसले नाहीत.

अनेक घोषणा केल्या मात्र केवळ जनतेला फसवण्याचे काम केलं आहे. कोरोनाच्या काळात मुंबईत लपून बसलेल्या केसरकरांनी संघर्षाची भाषा करू नये असा टोला राजन तेली यांनी लगावला.

ते म्हणाले एकीकडे भाजप मध्ये येण्यासाठी केसरकरांनी चर्चा करायची. देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरून मनधरणी करायची आणि दुसरीकडे नारायण राणे यांच्यावर टीका करायची अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत.

सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना आतापर्यंत दोन वेळा संधी मिळाली, मंत्री झाले तरी एकही रोजगार देणारा प्रकल्प त्यांना सुरू करता आला नाही.

आता हजारो कोटींचा प्रकल्प आणणार म्हणतायत. देवेंद्र फडणवीसांचे पाय धरून भाजपात घेण्याची विनवणी करणारे दीपक केसरकर सिंधुदुर्गात भाजपाशी संघर्षाची भाषा करताहेत.

कसला संघर्ष करणार ? एकदा जाहीर तरी करा असे खुले आव्हान राजन तेली यांनी आमदार केसरकर यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here