रेडी येथे दशावतारी नाटकाच्या रंगमंचावरच कला कला आला हृदय विकाराचा झटका कलाकार सुखरूप मात्र चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ होतो व्हायरल

0
1371

 

सिंधुदुर्ग – वेंगुर्ला तालुक्‍यातील रेडी येथे दशावतारी नाट्य महोत्सवादरम्यान सुरू असलेल्या नाट्यप्रयोगातील एक दशावतारी कलाकाराची तब्येत अचानक बिघडली हृदयविकाराचा झटका आल्याने हा कलावंत रंगमंचावरच कोसळला. तात्काळ या कलाकाराला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत असल्याबाबत नाट्य महोत्सवाचे आयोजक प्रितेश राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रितेश राऊळ मित्र मंडळ व दशावतार कलाप्रेमी ग्रुप रेडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत रेडी ग्रामपंचायत नजीक दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्य महोत्सवात शनिवार ९ एप्रिल रोजी नाईक दशावतार कला मंडळ झरेबांबर दोडामार्ग या नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सुरू होता. या नाट्य प्रयोगातील शेवटचा प्रसंग सुरू असताना श्री बांदेकर नामक नाट्यकलावंत यांची तब्येत अचानक ढासळली व ते चालू नाट्यप्रयोगात संवाद बोलता बोलता रंगमंचावर कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच प्रितेश राऊळ मित्र मंडळाचे कार्यकर्ते व सदर दशावतार नाट्यमंडळाचे मालक यांनी त्यांना तात्काळ रेडी येथील रेडकर हॉस्पिटल येथे दाखल केले. रेडकर हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची तब्येत स्थिर असून येत्या एक-दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देणार असल्याची माहिती प्रितेश राऊळ मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रितेश राऊळ यांनी दिली आहे.

दरम्यान या नाट्य महोत्सवात नाट्यप्रयोग चालू असताना श्री बांदेकर हे नाट्य कलावंत संवाद बोलता बोलता रंगमंचावर कोसळले याचा व्हिडिओ सध्या चुकीच्या अफवांद्वारे व्हायरल होत आहे. या अफवांवर विश्वास न ठेवता सदर व्हिडिओ चा प्रसार कोणीही करू नये व आपल्या कोकणची दशावतार लोककला चांगल्या पद्धतीने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन प्रितेश राऊळ यांनी केले आहे.

दरम्यान या प्रसंगाच्या निमित्ताने नाटक असं असतं राजा…नाटक असं असतं… हे नटसम्राट नाटकातील वाक्य अनुभवायला मिळालं! hatsoff राजन बांदेकर सर! तुम्हाला सॅल्युट आहे .हृदय विकाराचा झटका येऊन सुद्धा तुम्ही शेवटच्या क्षणा पर्यंत नाटक जिवंत ठेवलात show must go on म्हणजे काय असत हे जगाला दाखवून दिलात. लवकर बरे व्हा ,नटराजाचा वरदहस्त सदैव तुमच्यावर राहो! अशा प्रतिक्रिया नाट्यप्रेमी मधून उमटू लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here