राज्यातील वाढत्या बेरोजगारीला डबल इंजिन सरकारचे गलथान जबाबरदार:- अजय खोलकर

0
142

 

राज्यातील डबल इंजिन सरकार युवकांना नोकऱ्या देण्यात अयशस्वी ठरले, मात्र त्यांच्या नोकऱ्या हिसकावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले आहे. खरं तर राज्य सरकारने शिक्षण, गुंतवणूक,उद्योग उभारणी, शेती या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. परंतु तशे कधी सरकारकडून केले गेले नाही. रोजगार बाबतीत आपले राज्य हे केंद्रशासित प्रदेश सोडल्यास पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील ह्या बेरोजगारीचं भीषण वास्तव दाखवून देण्यासाठी काल आर.जी. चे प्रवक्ते अजय खोलकर यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती.

राज्यात रोजगार बाबतीत गोवा सरकार कसा अपयशी ठरलेला आहे, हे विदारक सत्य आकड्या सहित रिपोर्ट्स यावेळी गुगलच्या माध्यमातून अजय खोलकर यांनी प्रसार माध्यमांच्या समोर ठेवण्यात आले. देशभरातील बेरोजगारीची सरासरी आकडेवारी ही ३.२ असून, आमच्या गोवा राज्याची बेरोजगारीचा आकडा हा ९.७ म्हणजेच तीन पट अधिक आहे. देशातील तेलंगाना आणि तामिळनाडू सारख्या राज्यांची बेरोजगारी दर खूप कमी आहे. गोवा हे राज्य सर्वात लहान असून सुद्धा इतकी बेरोजगारी कशी हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होय असल्याचे खोलकर म्हणाले.

राज्यात १५ ते २९ वर्ष वयोगटात बेरोजगारीत गावातील पुरुषांचा आकडा हा २७.७ असून महिलांचा ५९.९ आहे, हे चित्र भयावह असून, शहरांमध्ये महिलांचा बेरोजगारी आकडा ३२ आहे. जेव्हा ह्या वयोगटातील बेरोजगार लोकं ३० ते ४० वर्षांचे होणार तेव्हा ह्या लोकांनी पुढे काय करावे, सरकार तेव्हा त्यांना फुगडी घालण्यास, फुले मारण्यासाठी तसेच राजकीय सभामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यासाठी वापरणार आहे काय? हे आधी स्पष्ट करावे.

राज्य सरकारने निवडणुकांवेळी जनतेला भुरळ घालण्यासाठी अनेक योजना दाखविल्या. त्यामध्ये १०००० नोकऱ्या देण्यात येईल असेही आश्वासने दिली होती. अप्रेंटीशिप योजना ही फेल ठरली. राज्य सरकारवर असलेला अविश्र्वासामुळे एकूण ९००० जागेमध्ये फक्त २५ टक्केच युवकांनी सहभाग दर्शविला. राज्यात ६००० जागा भरतीसाठी जॉब फेयर आयोजित केले गेले, त्यामध्ये २१००० उमेदवारांनी अर्ज भरले. परंतु ९४० जागावरच नोकर भरती करण्यात आली. एकूणच हा सरकारचा फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचे खोलकर म्हणाले.

राज्यात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत, व हे डबल इंजिन सरकार हे तर आम्हीच कसा सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देत आहोत याचे गोडवे गात असतात. अनेक योजनांचा दाखला देत हजारो-लाखो रोजगार दिल्याचं म्हणतात. पण प्रत्यक्षात वस्तूस्थिती काय आहे? बेकारी प्रचंड वाढत आहे…शिकलेले, कुशल तरुण नोकरी आणि कामधंद्यासाठी आतूर होऊन बसलेले आहेत. त्यांच्या या असहाय्यतेकडे सरकार-प्रशासन काहीच लक्ष देत नाही. जेव्हा कौशल विकास खाते मुख्यमंत्र्याकडे व श्रम शाशक्तिकरण खाते दुसऱ्या मंत्र्याकडे असेल तर, गोव्याची दिशा आणि गोवेकरांची दशा काय होणार हे सांगायची गरज नाही. आज राज्य सरकार कृषी पॉलिसी, पर्यटन पॉलिसी राबविण्याची भाषा करतात, परंतु, हेच राज्य सरकारकडे रोजगार संबंधी पॉलिसी नाही. राज्यातील या निरंतर वाढत्या बेरोजगारीला जबाबदार प्रमोद सावंत यांचे डबल इंजिनचे गलथान कारभारच आहे, आतातरी यापुढे सरकारने रोजगार निर्मितीसाठी पॉलिसी कराव्या अशी मागणी खोलकर यांनी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here