राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, आमदार नितेश राणे यांची ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका बाळासाहेब ठाकरे स्मारकरच्या भूमिपूजन सोहळ्याला फडणवीस यांना निमंत्रण नसल्याने टीका

0
145

 

 

सिंधुदुर्ग – स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकरच्या भूमिपूजन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले नसल्याने भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्यांची मने खूप लहान झाली आहेत असे म्हटले आहे.

आज बाळासाहेब असते तर….

भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे की, आज बाळासाहेब असते तर असे होऊ दिले नसतं. एक सच्चा, मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे ज्यांच्या खात्याचा हा कार्यक्रम आहे. त्यांनाच बोलवण्यात नाही आलं. याने शिवसेनेत सुरु असेलेली गटबाजी सिद्ध होते. आज शिवसेनेमध्ये कडवट शिवसैनिकांची किंमत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विट मध्ये काय म्हटले आहे ?

आज मा.बाळासाहेब असते तर , पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते.मा.बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं,त्यांच्यानंतर … फक्त किस्से मोठे आहेत , मन खूप लहान झाली आहेत ! अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here