रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा ही काळ्या दगडावरची रेष…*; *डॉ.प्रमोद सावंत यांचा मोठा दावा…* ; *महायुतीत उमेदवारीवरून वादाची ठिणगी ?

0
57

 

कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड 32 व मावळ या तिन्ही लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे कमळ फुलणार हे निश्चित आहे असा प्रबळ दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ते रत्नागिरी दौऱ्यावर असताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळ माने, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवरून महायुती मधील शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

यही समय है…सही समय है…अबकी बार चारसो पार…फिर एक बार मोदी सरकार.. हा नारा देत असतानाच 370 जागा आपल्याला भाजपाच्या निवडून आणायचे आहेत आणि या 370 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा भाजपाची असून येथे कमळ फुलवायचे आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे कोणीही कोणतेही तिकीट मागू द्यात ही तिकीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळाचच असं मोठा दावा करणारे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी येथे बोलताना केला आहे. ज्यावेळेला एक मुख्यमंत्री तुमच्याकडे येतो त्यावेळेला तुमच्या लक्षात यायला पाहिजे की देअर इज नो कॉम्प्रोमाइज कारण मी येताना देवेंद्रजींकडे बोलून आलो आहे कारण कोकणावरती आणखी अन्याय होणार नाही खूप झाले आता आम्ही खूप बघितलं आजवर कोणामुळे अन्याय झाला हे तुम्हाला माहीत आहे पण आता आपल्याला भारतीय जनता पार्टी वरती पण आणि आपल्या कोकणातल्या जनतेवरती पण अन्याय होणार नाही आता मोदीजी आहेत असा आक्रमक पवित्रा डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. आणि या वेळेला निश्चितच विश्वास ठेवा की हा मतदारसंघ आपण कमळाच्या चिन्हावरच लढणार आणि आपला कार्यकर्ता यावेळी कमळावर निवडून लोकसभेत जाणार असाही हे निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्त्वांवरती भारतीय जनता पार्टीचे सरकार काम करतं असून अंत्योदय हे मूळ तत्व आहे ज्याच्या पर्यंत कोणीही पोहोचत नाही त्याच्यापर्यंत मोदीजींच्या सरकारच्या योजना भाजपाचा कार्यकर्ता पोचवले आहेत. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं काम मोदी सरकारने केला आहे. आता साठ दिवसात मोठं काम करावे लागणार आहे विकसित भारतासाठी मोदींसाठी लोक मत द्यायला तयार आहेत असे सांगत त्यांनी यावेळी विरोधकांचाही समाचार घेतला. इथे असतील अजून कोणीही असतील उबाठा असेल सुबाठा असेल अजून असे कोण कोण असतील पण एक लक्षात घ्या या वेळेचा मतदान हे विकसित भारतासाठी आहे. मोदी सरकारने आजवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक योजना आणल्या स्टार्ट अप इंडिया, पीएम विश्वकर्मा, घरकुल योजना, हर घर नल पाणी योजना,मुद्रा योजना अशा अनेक योजना मोदी सरकारने आणल्या. शेतकरी,मच्छीमार,युवक, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदी सरकारने योजना आणल्या

2004 ते 2014 या काँग्रेसच्या काळात देशासाठी एकही योजना आली नाही मनमोहन सिंग सरकारने केलेली एक तरी योजना सांगा हे माझं खुले आव्हान आहे हीच काँग्रेसचे नेते होती आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या धोरणामुळे देश भारत डबघाईस गेला काँग्रेसच्या काळात अनेक स्कॅम उघडकीस आले हे नव मतदाराला सांगा असही आवाहन त्यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here