रत्नागिरी जोरदार पाऊस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली वाहतूक विस्कळीत महामार्ग व कोकणरेल्वेवरील वाहतूक विस्कळीत ;प्रवाशांचे हाल

0
131

 

सिंधुदुर्ग – कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे रविवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. याचा मोठा परिणाम मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती रखडलेल्या कामाचा फटका पुन्हा एकदा परतीच्या पावसात बसला आहे. निवळी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने महामार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूकडून मोठ्या रांगा आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक पडझडीच्या घटना घडल्या आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी जवळ दरड कोसळली आहे.मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत आहे पाऊस सुरू असलेले प्रवास करावा का अशी विचारलं प्रवास करणारे प्रवासी सोशल मीडिया वरून करत आहेत. सुदैवाने रत्नागिरी जवळील निवळी वगळता महामार्गावरती वाहतूक सुरळीत आहे. सलग सुट्ट्या असल्याने मुंबई पुण्यातून कोकणात आलेल्या पर्यटकांची संख्या ही मोठी आहे मात्र या सगळ्या पर्यटकांचेही महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने झाले आहेत. रस्त्यावरील मातीबद्दल हटवण्याचे काम युद्ध पातळीवर प्रशासनाकडून सुरू करण्यात आल आहे. दरड कोसळून माती महामार्गावर आल्याचे कळतच तात्काळ घटनास्थळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.

रत्नागिरी जवळ महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळली आहे. दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रत्नागिरी-पाली मार्गावर पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील
कापडगाव, नागलेवाडी परिसरात पावसाच्या पाण्यामुळे गाड्या अडकल्या आहेत. वाहत्या पाण्याला जोर असल्याने वाहने अडकून पडली आहेत. पावसाची संतधार चालू असल्याने पावसाचे पाणी वाहतेय थेट रस्त्यावरून वाहत आहे.

महामार्ग व रेल्वे दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत

त्यामुळे महामार्गावर रखडलेली वाहतूक कोकण रेल्वे मार्गावरील विस्कळीत झालेला प्रवास यामुळे कोकणातील प्रवाशांची दयनीय अवस्था असून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये महिला लहान मुले आदींचा समावेश आहे. महामार्ग प्रमाणे कोकण रेल्वेच्या स्थानकांवरती ही मोठी गर्दी असून प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाबद्दल ही संताप व्यक्त केला जात आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या उशिराने धावणाऱ्या गाड्या याबद्दल कोणतीही नीट माहिती प्रवाशांना दिली जात नाही या सगळ्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here