28.5 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

रत्नागिरीतील घरडा केमिकल्स कारखाना स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करणार; राज्यमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनीत काल झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोटे दुर्घटनेची राज्यस्तरावर दखलया दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे घरडा केमिकल्सतर्फे सांगण्यात आले असून जखमी कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने औद्योगिक सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी गरज आहे, अशा ठिकाणी औद्योगिक सुरक्षा उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील, असेही राज्यमंत्री आदिती सुनिल तटकरे यांनी सांगितले आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img