मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते डॉ. प्रकाश वाजरिकर यांच्या दोन पुस्तकांचे विमोचन.

0
105

 

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते डॉ. श्री प्रकाश वजरीकर लिखित “आव्तु द फॅ या गोवा इन्क्वीजीशन” विषयावर नाटकाचे व “सावळ” या समिक्षा पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.
साखळी येथील रवींद्र भवन येथे पार पडलेल्या विमोचन सोहळ्याच्या वेळी इन्क्वीजीशन या विषयावर नाटक लिहिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी डॉ. प्रकाश वजरीकर यांचे अभिनंदन केले. आव्तु द फॅ या नाटका साठी गोव्याचे एन आर आय आयुक्त माजी खासदार श्री नरेंद्र सावईकर यानी प्रस्तावना दिलेली आहे तर श्री निलेश महाले यांचे सूचक मुखपृष्ठ आहे. सावळ हे समिक्षा साहित्य कोंकणीं समिक्षा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
सावळ या पुस्तकांसाठी राजू नायक यांची प्रस्तावना आहे. रवींद्र भवन, साखळी येथे आयोजित कार्यक्रमात रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष विठोबा घाडी हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास ग्रामीण कला आणि संस्कृती संस्था सत्तरी चे श्री. झिलू गांवकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्र संचालन मिहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सहाय्यक माहिती अधिकारी श्री श्याम गांवकर यानी केले तर संतोष मळीक यानी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here