मी आजही राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार – अजित पवार

0
104

मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. आपल्याबाबत मीडियात अनेक बातम्या मीठमसाला लावून दिल्या गेल्या त्याबाबत आपल्याला काही बोलायचं नाही. मात्र सर्व गोष्टींचे योग्यवेळी स्पष्टीकरण देईन असे सांगितले.

अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या 3 दिवसांत राजीनामा दिला आहे.नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. त्यामुळे महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे या तीनही पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here