मालवनमध्ये 20 पर्यटकांना घेऊन बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

0
394

 

सिंधुदुर्ग – मालवण तारकर्ली समुद्रकिनारी विस पर्यटकांना घेऊन गेलेली बोट बुडाली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे. मालवण शासकीय रुग्णालयात या पर्यटकांवर उपचार सुरू आहेत.

20 पर्यटकांपैकी 18 पर्यटकांना वाचविण्यात यश आले आहे. 14 पर्यटक सुखरूप असून त्यांना स्थानिकांनी तात्काळ पाण्याबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हे पर्यटक स्कुबा डायविंग साठी गेले असताना हा अपघात घडला आहे.

सध्या कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती आहे. जोरदार वारे वाहत आहेत यावी असलेल्या खराब हवामानामुळे बोट बुडाली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत, ते या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी तात्काळ मदत कार्य राबविण्यात आल्याने बाकी पर्यटकांना वाचविण्यात यश आले आहे.

पर्यटकाना स्कुबा डायविंग साठी घेऊन जाणाऱ्या या बोटीवर एकूण 20 पर्यटक होते. या पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. सध्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत असल्याने स्कूबा डायव्हिंगवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही ज्या व्यावसायिकांनी या पर्यटकांना स्कुबा डायविंग घडविण्यासाठी समुद्रात नेले त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मालवण पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here