सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील दांडी चर्च समोर मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला मंगळवारी आग लागल्याची घटना घडली.
वेळीच स्थानिक नागरिक व मच्छिमार यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेली मासेमारी जाळी, बॅरल व अन्य मासेमारी साहित्य तसेच गोडाऊन चे छप्पर जळून सुमारे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले आहे.
ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मालवण नगरपालिकेला देण्यात आली.
मात्र अग्निशमन यंत्रणा नसल्याने स्थानिक नागरिकांनी पाणी व अन्य आग विझवण्याच्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधीनीही त्या ठिकाणी धाव घेतली होती.