माझ्या चौकशी साठी भाजपच्या गृह खात्याचा दबाव दबावाला बळी पडून मी भाजपात जाणार नाही आमदार वैभव नाईक यांचे स्पष्टीकरण

0
174

सिंधुदुर्ग – आपल्या एसीबी चौकशीसाठी भाजपच्या ताब्यात असलेल्या गृहखात्याचा दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कितीही दबाव आला तरी आपण भाजपात प्रवेश करणार नाही असेही आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात काल आमदार वैभव नाईक यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र वैभव नाईक काल अनुपस्थित राहिले होते त्यावर प्रतिक्रिया देताना अजून काही वेळ मागून घेतल्याक्सचे वैभव नाईक यांनी सांगितले.

गेल्या वीस वर्षाचे कागदपत्र जमा करायला काही वेळ लागेल त्यासाठीच वेळ मागून घेतल्याची प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे. कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. तर भाजपच्या गृह खात्याच्या माध्यमातून याप्रकरणी राजकीय दबाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कितीही दबाव आला तरी मी भाजपमध्ये जाणार नाही अशी भूमिका वैभव नाईक यांनी मांडली. पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत त्यामुळेच अशा पद्धतीची कारवाई भाजपकडून होत असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here