माजगाव येथे भर रस्त्यात भल्यामोठ्या गव्यांच्या कळपाने दिले दर्शन परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण

0
11

 

सिंधुदुर्ग – माजगाव येथे भर रस्त्यात आज भल्यामोठ्या चार-पाच गव्यांच्या कळपाने दर्शन दिले. ही घटना येथील साधले वडापाव हॉटेल नजीक सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान त्या ठिकाणावरून जाणाऱ्या काहींनी ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे. तर परिसरात दिवसाढवळ्या गवे फिरू लागल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी-इन्सुली रस्त्यावर हा गव्यांचा कळप आढळून आला.

त्या मार्गाने जाणाऱ्यांच्या तो निदर्शनास पडला. त्यातील काहींनी ते दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे.

दरम्यान परिसरात दिवसाढवळ्या गवे फिरू लागल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here