शिवसेना प्रवेशासाठी पालकमंत्री निधी देतात हे खरे का ? नारायण राणेंच्या प्रश्नाने नियोजन समिती सभेत गदारोळ जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली सभा

0
52

 

सिंधुदुर्ग – शिवसेना प्रवेशासाठी पालकमंत्री निधी देतात हे खरे का ? नारायण राणेंच्या प्रश्नाने नियोजन समिती सभेत मोठा गदारोळ झाला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या उत्तरानंतर शिवसेना सदस्यांनी बाके वाजवली. तर राणे यांनी यात बाके वाजवण्यासारखे यात काय आहे ? असे विचारत एकेक प्रकरणे बाहेर काढून तुमची पळता भुई थोडी करेन असा थेट इशारा दिला. यानंतर भाजप सदस्यांनी देखील बाके वाजवली. काही काळ सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता.

 

सभागृहात झाला जोरदार गोंधळ

 

जिल्हा नियोजनचे अध्यक्ष उदय सामंत नियोजनचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य देतात असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला यावेळी सभागृहात गदारोळ झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर नियोजन चा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना परस्पर देण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. राणेंनी पेपर मध्ये आलेली बातमी चा पुरावा देत हा आरोप केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उदय सामंत यांनी सेनेच्या सदस्यांना गप्प राहण्याचे आवाहन केलं. मात्र नियोजनाचा निधी कुठे ही परस्पर नियोजन समितीच्या सभेस शिवाय दिला जात नसल्याच सांगितले. मात्र पेपर मधील बातमी ही शिवसेनेच्या मेळाव्यात बोललो तेव्हाची होती. मात्र असा उल्लेख मी कुठे केला नसल्याचं उदय सामंत यांनी सांगत वादावर पडदा टाकण्याच काम केलं.

 

पारकर राणे आमनेसामने

 

 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ, बुडवणाऱ्यानी हे आम्हाला शिकवू नये असा टोला शिवसनेचे नियोजनचे सदस्य संदेश पारकरांना लगावला तर नितेश राणेंनी तुम्हाला लोकांनी नाकारलं आणि तुम्ही लोकांना फसवलं त्याची लिस्ट आम्ही काढू अस म्हटले यावेळी सभागृहात गोधळ निर्माण झाला. सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम प्रतीभा कृषी प्रक्रिया लिमिटेड कोडोली या संस्थेने दुधापोटी येणे असलेली बाकी रक्कम २ कोटी ७७ लाख रुपये गेले चार वर्षे देण्यास टाळाटाळ करून येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मुद्दा समोर आला यावेळी सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीतुन मुक्तता मिळावी म्हणून नियोजन समितीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभागृहात ज्यांच्यावर आरोप केला जातो त्यांची नाव घ्यावीत आम्ही जबाबदारी घेऊ असं म्हटलं तर पैसे बुडवणाऱ्यानी हे आरोप करू नयेत असाही आरोप शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य असलेले संदेश पारकरांना टोला लगावला तेव्हा पारकरांनी हा सदस्यांचा अपमान असल्याचं म्हटलं यावेळी आमदार नितेश राणे यांनी तुम्ही लोकांना लूटल्याची लिस्ट देऊ म्हणून तर कणकवलीतील लोकांनी पाडलं असा टोला संदेश पारकर यांना लगावला.

 

वागदे,ओसरगाव येथील विकासकामे कुडळाचे आमदार आणि पालकमंत्र्यांनीच रोखली – नितेश राणे

 

कुडाळ मालवणचे आमदार वागदे ओसरगाव मध्ये सुचविली कामे थांबवतात.हे योग्य आहे काय.पालकमंत्री त्या पत्राला स्वतःचे पत्र जोडून काम थांबवा असे आदेश दिले.नेहमी इतर कामासाठी पालकमंत्री तुम्ही फोन करता तसा फोन करून जरी मला विचारले असते तर तुम्हाला सांगितले असते.आता त्या दोन गावातील लोक गेटवर येऊन आंदोलन करत आहेत. त्यांना तुम्हीच कायते उत्तर द्या..!आणि कुडळाचे आमदार वैभव नाईक यांनी अशी पत्रे देणे थांबवावीत आणि आपल्या मतदारसंघात जी कामे प्रलंबित आहेत ती पहावी. असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

 

नियोजन समितीच्या सभेला सुरवातीलाच गोंधळ सुरू झाला

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी सभेच्या सुरुवातीपासूनच गोंधळाला सुरुवात झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here