सिंधुदुर्ग – महिला उत्कर्ष समितीच्या कार्याचा गौरव म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाषचंद्र भंडारे आणि मयुरा सुभाषचंद्र भंडारे यांच्याहस्ते महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्षा तथा जेष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स पाळून जानवली आदर्श नगर येथे हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाषचंद्र भंडारे यांनी समाजसेवे बद्दल उत्तम मार्गदर्शन केले आणि महिला उत्कर्ष समितीच्या पुढील कार्यक्रमांना आपण सहकार्य करू असे ही सांगितले. या कार्यक्रमात महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा ज्योतिका हरयाण, सचिव सुप्रिया पाटील, सदस्या अमिता राणे यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी महिला उत्कर्ष समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी महिला उत्कर्ष समितीच्या कोकण विभाग अध्यक्षा अक्षता कांबळी यांनी उपस्थित महिलांचे आभार मानून डॉ. सुभाषचंद्र भंडारे या उभयतांना धन्यवाद दिले.
महिला उत्कर्ष समितीच्या कार्याचा गौरव, डॉ. सुभाषचंद्र भंडारे यांच्याकडून कोकण विभाग अध्यक्षा जेष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सत्कार
