महाविद्यालयात फॉर्म भरायला आली…एसटी बस कॅन्सल झाली म्हणून रिक्षात बसली…तो प्रवास अखेरचा ठरला दापोलीतल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या हुशार विद्यार्थिनीची एक्झिट चटका लावणारी

0
640

 

कोकण – पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या राज्यात रत्नागिरी जिल्हयात दापोली आसूद येथील भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मृत्यू झालेल्यामध्ये मीरा बोरकर हिची एक्झिट चटका लावणारी ठरली आहे. अत्यंत हुशार असलेली सीईटीच्या परीक्षेत तब्बल यावर्षी 96 टक्के गुण मिळवून चमकलेली
मीरा महेश बोरकर महाविद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी दापोली येथे आली होती आपल्या पाडले या गावात मोबाईलचे नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवर ओटीपी येत नाही त्यामुळे फॉर्म भरण्यास अडचणी येतात म्हणून ती दापोली येथे महाविद्यालय प्रवेशाचा ऑनालाइन फॉर्म भरण्यासाठी आली होती दापोलीत हा फॉर्म भरून झाल्यानंतर याच दिवशी केळशी मार्गावर धावणारी दुपारी सव्वा बाराची एसटी गाडी कॅन्सल झाली होती. त्यामुळे मीरा वडाप मध्ये बसली. तिला आयटी महाविद्यालयात मुंबई येथे प्रवेश घ्यायचा होता यासाठी तिने गेल्या वर्षी 93 टक्के मार्क मिळाल्यानंतरही एक वर्षाची शैक्षणिक गॅप घेतली व यावर्षी जिद्द बाळगत सीईटी मध्ये सरस मार्कही मिळवले.

याच दरम्यान हा फॉर्म भरत असताना दापोली येथे मूळचे पाडले गावातील असलेले शेजारी असलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती सदस्य रवींद्र सातनाक यांचीही योगायोगाने भेट झाली होती त्यांनीही तीला आपण बरोबर जाऊ मी माझं काम आटपून येतो इतकही सांगितलं मात्र तिच्या तिला वडिलांचा फोन आला व शेजारी असलेल्या काकांना घरी येण्यास उशीर होईल थोडावेळ लागणार असल्याने तिने वडाप गाठले आणि इथेच मोठा घात झाला. वडाप प्रवास रिक्षेने मीरा प्रवास करत होती त्याच गाडीचा आसूद येथे भीषण अपघात झाला आणि यातच दुर्दैवाने मीराचा मृत्यू झाला. अत्यंत हुशार असलेल्या मीराने अशाप्रकारे घेतलेली अकाली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली आहे

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मीराने गेल्यावर्षी सीईटीची परीक्षा दिली होती त्यावेळी तिला 93 टक्के मार्कही पडले होते मात्र हे मार्क्स तिला मनासारखे नव्हते म्हणून गेल्या वर्षी तीने एक वर्षे गॅप घेतली. आपल्याला हव्या त्या महाविद्यालयात तिला मुंबईत प्रवेश घेता आला नव्हता म्हणून तिने एक वर्षाची गॅप टाकत यावर्षी पुन्हा जोमाने सीईटीची परीक्षा दिली त्यात तिला तब्बल 96 टक्के मार्क पडले होते यासाठीच आयआयटी प्रवेशासाठी महाविद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी आली होती आणि हा प्रवास तिचा दुर्दैवाने अखेरचा ठरला.

पाडले येथील इयत्ता पहिली ते पाचवी जिल्हा परिषद शाळेत नंतर दापोलीच्या आर आर वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले व अकरावी बारावी तिने रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केल होते व त्यानंतर आयटीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याने तिने सीईटीची परीक्षा दिली. मीराचे वडील शेतकरी आहेत मिरच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे.

दोघींची भेट हुकली आणि अनर्थ घडला…

याचवेळी पाडले येथे घरी जाण्यासाठी निघालेली शेजारची भार्गवी दापोली एसटी बस स्टँड मध्ये आली होती तिने एसटी सुटण्यासाठी तब्बल दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहिली मात्र बोरकर हिला मामाने एसटी कॅन्सल झालेने वडाप रिक्षाने जाण्यासाठी सोडले होते ती यापूर्वी एसटी शिवाय कधीच प्रवास करायची नाही मात्र तिची मात्र तिने घेतलेले एक्झिट याला एसटी प्रशासनाचा बेजबाबदा व भोंगळ कारभारही तितकाच कारणीभूत ठरला आहे त्यामुळे एसटी प्रशासनाच्या या भूमिकेबद्दलही संताप व्यक्त होत आहे. पण जर का मीरा एसटी स्टॉल वरती आली असती व भार्गवीची भेट झाली असती तर या दोघींनी एकत्रच दुपारी तीन वाजता सुटणाऱ्या एसटी बस मधून तिथून प्रवास केला असता हे हे निश्चित होत पण निष्ठूर नियतीने हे होऊ दिले नाही.मीराची आठवण आली मैत्रीणींना रडू कोसळते आहे

या दुर्देवी अपघातात पुढील आठ जणांचा मृत्यू

मरियम गौफिक काझी-6, स्वरा संदेश कदम-8,संदेश कदम-55 ,फराह तौफिक काझी-27 सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग ४५ रा.हर्णै (चालक) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघात रात्री उशीरा आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री उशिरा मिरा महेश बोरकर-22 पाडले,वंदना चोगले-38 पाजपंढरी व अलीकडे उपचार असताना राष्ट्रीय खेळाडू असेलल्या भूमी सावंत हीचाही मृत्यू झाला.

दरम्यान प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना घोलप बोंबे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना नुकतीच देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here