महाराष्ट्र सरकार केरळमधील डॉक्टरना 20 लाखाचे पॅकेज द्यायला तयार, इथे पगार द्यायला पैसे नाहीत आमदार नितेश राणे यांचा आरोप

0
190

 

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र सरकार केरळमधील डॉक्टरना 20 लाखाचे पॅकेज द्यायला तयार, तसे पत्र केरळच्या आरोग्य मंत्र्यांना सरकारने लिहिले आहे. हे पत्र आपल्याकडे असून,इथे मात्र डॉक्टर व नर्सचे पगार द्यायला सरकारकडे पैसे नाहीत असा आमदार नितेश राणे यांनी आज कणकवली येथे बोलताना सरकारवर आरोप केला आहे.

इथे शासकीय डॉक्टर आणि नर्सचे अर्धे पगार कापले जातात. खरतर येथील शासकीय वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांना बोनस दिला पाहिजे होता मात्र सरकार भलतीकडे पैसा खर्च करू पाहत आहे, असे आमदार राणे म्हणाले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतींना 10 लाखाचा निधी द्या अशी मागणी आपण केली. मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. गावचे सरपंच स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आपल्या गावात येणाऱ्या लोकांची व्यवस्था करत असल्याचे आमदार राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here