सिंधुदुर्ग : येत्या आगामी काळात अयोध्येतील राम मंदिरावरून राजकारण रंगू लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजप अयोध्येतील राम मंदिर कधी पूर्ण होतंय त्यांची वाट पाहतायत.सध्या मंदिराचे काम वेगाने सुरू आहे.आतापर्यंत सुमारे 50 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले.त्यामुळे राम मंदीर कधी पूर्ण होतंय त्याची वाट भाजपमधील काही नेते वाट पाहतायत. आयोध्येतील राम मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका नाही. तर महाराष्ट्रात मुदतीपूर्व निवडणुका लागण्याची शक्यता आहे असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रामध्ये मुदतपूर्व निवडणुका 100% लागणार अस वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.मात्र लोकसभेच्या निवडणुका वेळच्यावेळी होतील असेही राऊत म्हणाले. कारण भाजप सरकारला राम मंदिराचा जर्णोद्धार झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुकांसमोर जाण्याचे धारिष्ट भाजप सरकार करणार नाही.म्हणून मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र प्रशासन चालवतय इथे लोकप्रतिनिधीना स्थान नाही आहे.मात्र लोकसभेच्या निवडणुका वेळेवर होतील. महाराष्ट्रा सहित अनेक राज्यातील विधानसभा वन नेशन वन इलेक्शन याच
सस्त्राखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही खासदार विनायक राऊत म्हणाले.