भाजपा महिला मोर्चातर्फे “बाजरी” विषयी जनजागृती

0
156

भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चाच्यावतीने आंतराष्ट्रीय बाजरी वर्षानिमित्त बाजरीचे महत्व पटवून देण्यासाठी राज्यात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी डॉ. स्नेहा भागवत या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाजरीचे आरोग्यावरील तीन प्रभाव, बाजरीचे उत्पादन, आवश्यक हवामान आणि बाजारपेठ म्हणजेच ग्राहक यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत, अध्यक्ष आरती बांदोडकर, सरचिटणीस अनिता कवळेकर आणि इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिला मोर्चाच्या वतीने आगामी काळात जनजागृती आणि प्रचाराचे कार्यक्रम घेणार असल्याची माहिती डॉ. स्नेहा भागवत यांनी दिली. तसेच बाजरीची वाढ, वापर आणि पौष्टिक फायदे याचीही माहिती दिली. यावेळी बाजरीपासून बनवलेले विविध खाद्य पदार्थ यांचे छोटेखानी प्रदर्शन मांडण्यात आले होते.
या कार्यक्रमास महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here