सिंधुदुर्ग – जिल्ह्यामध्ये वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतुन कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने कोविड केअर सेंटर उपलब्ध करून दिले आहे.आज या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, जि.प.सदस्य नागेंद्र परब,जि. प. सदस्य रणजित देसाई, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक,माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळी,गटविकास अधिकारी विजय चव्हाण, अतुल बंगे,डॉ. संजय निगुडकर, राजन नाईक,संतोष शिरसाट व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या या कोविड केअर सेंटरची यावेळी पाहणी करण्यात आली. तसेच संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या या सेवेबद्दल कौतुक करण्यात आले. हे कोविड केअर सेंटर सर्वांसाठी नि:शुल्क खुले करून दिले गेले आहे.