बिनपासी साग लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त ५१९ घनफुट सागवान लाकडासह लाखो रुपये किमतीचा ट्रक जप्त

0
133

सिंधुदुर्ग – कुडाळ वनपरिक्षेत्र विभागाने अवैध साग लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकसह लाखो रुपये किंमतीचे साग लाकूड जप्त केले आहे.

२६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास टाटा मॉडेल 2515 EX वाहन क्र. KA 28/8981 या कर्नाटक राज्यातील वाहनामधून साग इमारती लाकडाची विनापरवाना साळगाव ता. कुडाळ येथुन बेळगांवकडे वाहतूक होत असलेबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली होती.

साळगाव येथे संशयास्पद ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकात अवैध साग इमारती नग ११९/ ५१९ घनफुट माल आढळून आला.

प्रकरणी इम्तियाज दस्तगीर मुजावर ( रा. चंदगड जि. कोल्हापूर ) याच्या विरोधात वनोपज लाकूड मालाची विनापरवाना विनापासी अवैध वाहतूक करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (2ब), महाराष्ट्र वन नियमवाली २०१४ चे नियम ३१, ८२ चे उल्लंघन केल्याने वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करणेत आला आहे.

वाहतूकसाठी वापरण्यात आलेले टाटा कंपनीचा मॉडेल 2515 EX वाहन व साग इमारती लाकूड माल जप्त करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे म्हणाले लाकूड मालाची विनापासी अवैध वाहतूक करणे भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये प्रतिबंधित असून अशा अवैध वाहतुकीकरिता २ वर्षे पर्यंतच्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाचीही तरदूत करणेत आलेली आहे.

अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने धडक कारवाई सुरू केली असून असा अवैध प्रकार दिसून आल्यास वनविभागास कळविण्याचे आवाहनही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here