फातोर्डा येथील प्रीतम नाईक यांनी साकारली विघनहर्त्याची आकर्षक मूर्ती वडिलांचा मूर्तिकलेचा वारसा नेताहेत पुढे

0
208

पणजी – गोवा ही कलाकारांची खाण म्हणून ओळखली जाते व वेगवेगळ्या सणानिमित्त कलाकार आपली कला सादर करीत असतात. गणेश चतुर्थी निमित्त गणपतीच्या मूर्ती बनविणे ही एक मोठी जबाबदारी मूर्तीकारांवरती असतें. त्यातल्या त्यात लोकांना आकर्षित करणाऱ्या कलेचं प्रदर्शन पण घडताना दिसत.

अशीच एक सुंदर मूर्ती फातोर्डा मडगांव येथे तुळशीदास नाईक यांच्या चित्रशाळेत त्यांच्या छोट्या मुलाने बनविली आहे. प्रीतम नाईक हे उत्कृष्ट कलाकार आहे व कला व संस्कृती खाते गोवा सरकारच्या कार्यालयात ते कामाला आहे. अगदी लहानपणापासून ते आपल्या वडिलांबरोबर गणरायाची मूर्ती बनविण्याचे काम करीत आलेले आहे. त्यांनी बनविलेल्या मुर्त्या एकदम सूंदर आणि प्रसिध्द आहेत व गोव्याच्या कानकोपऱ्यातून त्यांना मागणी आहे. वरील मूर्ती त्यांनी मडगांवचे राहणारे व मूळ मडकई फोंडा गावाचे असलेले भाजपचे युवा मोर्च्याचे सचिव श्री रघुवीर न शिरोडकर याच्या कुटुंबाच्या घरामध्ये पुजाना साठी खास त्यांच्या मागणिनुसार बनवलेली आहे. या मूर्तिचे वैशिष्ठ म्हणजे ही चिकणमाती पासून बनविली असून सुद्धा ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सारखी वाटते व याचे पूर्ण श्रेय मूर्तीकाराला जाते.

अशी सेवा जी वर्ष्यानुवर्षे त्यांच्या घरामध्ये चालू आहे त्यासाठी लोक त्यांच्या कुटुंभाचे आभारी आहोत. त्यांचे वडील श्री तुलसीदास नाईक तर गोव्यामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध आहे.. मंगलमूर्तीची सेवा त्यांच्या कुटुंबियां तर्फे अखंडित राहो अशी आमी देवाकडे प्रार्थना करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here