प्रस्तावित वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू

0
155

कोकणरेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत रेल्वेच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे अशी महिती समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी दिली. नुकतीच मडगाव येथे कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक कोकणरेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक ,केरळ या चार राज्यातील प्रतिनिधीं सह कोकण रेल्वेचे सर्व संचालक उपस्थित होते.प्रथमच चार राज्यातील पाच खासदार यावेळेस उपस्थित राहिले. ही सकारात्मक बाब असल्याचे या समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी सांगितले.

यावेळी पुणे- सावंतवाडी ही गाडी कायमस्वरुपी प्रत्येक वीकएंडला सुरू ठेवण्याची मागणी केली असता या गाडीची शिफारस रेल्वेबोर्डा कडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. संगमेश्वर साठी राखीव डबा पॅसेंजरला या पुर्वी जसा होता तो पुर्ववत करण्याची मागणी केली असता तो दहा जुलै पासून करण्याचा निर्णय झाला. तुतारी एक्स्प्रेस ला करोना पुर्वी नांदगाव येथे हाॅल्ट होता सध्या तो बंद आहे तो पुन्हा चालू करण्याची मागणी सचिन वहाळकर यांनी केली. करोना पुर्वीचे सर्व थांबे कायम करण्यात यावेत असा ठराव रेल्वेबोर्डाकडे पाठवला जाणार आहे.

बांद्रा टर्मिनस किंवा वसई येथुन रोज एक गाडी सोडण्याची मागणी करण्यात आली केली हा प्रस्ताव पश्चिम रेल्वेकडे पाठवण्याचा निर्णय झाला. या व्यतिरिक्त खासदार धनंजय महाडिक यांनी वैभववाडी कोल्हापूर या प्रकल्पाबाबत मुद्दा उपस्थित केला असता हा प्रस्ताव आता कोकण रेल्वेच्या अखत्यारीत नसुन रेल्वेमंत्रालयाकडे आहे अशी माहीती मिळताच आपण स्वतः याचा केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

एकुण 308 गणपती स्पेशल ट्रेन प्रस्तावित असून त्या पैकी 208 च नोटिफिकेशन जुलैअखेर झाल आहे. गणपती बुकिंग दरम्यान एक मिनीटात सर्व बुकिंग फुल झाल्याचा विशेष मुद्दा उपस्थित करत याबाबत मध्यरेल्वेने चौकशी करुन त्याची विस्तृत माहीति मिडीया मधुन दिली पण कोकण रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती स्थानिक मिडीयामधुन प्रवासी वर्गाला न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भविष्यात को.रे.च्या जनसंपर्क विभागाने याची व इतर वृत्तांची दखल तातडीने घेण्याची सुचना केली. अनेक विषय हे मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे,तसेच रेल्वेबोर्डाच्या कार्यकक्षेत असल्याने ते सोडवण्यासाठी उपस्थित खासदारांनी प्रयत्न करावेत अशी विनंती वहाळकर यांनी सर्व खासदारांना केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here