परवागनी केंद्र सरकार देत असले तरी,चिपी विमानळ राज्य शासनाचे – माजी मंत्री दीपक केसरकर चांगल्या कामात विघ्न नको, राणेंचे नाव न घेता टीका

0
117

सिंधुदुर्ग – परवानग्या जरी केंद्र सरकार देत असले तरी,चिपी विमानतळ राज्य शासनाचे आहे.विमान उडणार हा आनंदाचा प्रसंग आहे.त्यात कोणी विघ्न आणण्याचे काम करू नये,असा पलटवार आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.

त्यांच्या पंतप्रधांनानी सुध्दा त्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात

दरम्यान अशा परिस्थितीत सुध्दा केंद्र आणि राज्य सरकार मध्ये भांडणे लावण्याचे काम करणार्‍यांना गणपतीने चांगली बुध्दी द्यावी,आणि त्यांच्या पंतप्रधांनानी सुध्दा त्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात,असे केसरकर म्हणाले. दीपक केसरकर यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विमानतळाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली.

काही लोक केंद्र आणि राज्य सरकार मध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत

यावेळी ते म्हणाले, अनेक वर्षे रखडलेल्या विमानतळावरुन विमान उडणार हे आनंदाची गोष्ट आहे.अशा परिस्थितीत त्याला चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. मात्र काही लोक केंद्र आणि राज्य सरकार मध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत.अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य त्या सुचना द्याव्यात. ते पुढे म्हणाले, विमानतळाच्या परवानग्या जरी केंद्राचा विषय असला तरी विमानतळ राज्य शासनाचा आहे. यासाठी गणपतीपुर्वी परवानगी मिळणे गरजेचे होते. मात्र दुदैवाने ती परवानगी मिळाली नाही, असे ते म्हणाले.

कोटयावधीची गुंतवणूक असलेला प्रकल्प रेडीत येणार

कोट्यावधीची गुुंतवणूक असलेला मोठा प्रकल्प रेडी येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विरोधकांना कळले तर त्याला ही विरोध करतील त्यामुळे आत्ता काही सांगत नाही. चर्चा सुरू आहे मात्र, हा प्रकल्प झाल्यास त्याचा फायदा परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे असा विश्वास आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान माझी राजकीय संघर्षाची भूमिका होती, परंतू अशा गोष्टीमुळे विकास बाजूला राहणार असल्यामुळे मी आता माझा निर्णय बदलला आहे. संघर्ष आणि राजकारण करीत बसण्यापेक्षा या ठीकाणी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्यात मी मंत्री नसलो तरी माझ्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी काम करीत आहे असे केसरकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here