सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे.त्यामुळे या जिल्ह्यात अनेक छोटी मोठी हॉटेल प्रचंड आहेत.आणि पर्यटनाच्या दृष्टीने मालवण हे पर्यटकांचे तसेच पर्यटनाचे हॉटस्पॉट आहे.लाखो पेक्षा जास्त पर्यटक मालवणला भेट देत असतात.त्यामुळे हॉटेल मध्ये जेवण करणारे पर्यटक खूप आहेत.यावरुनच एका तरुणांच्या डोक्यात नवी संकल्पना रुजली आणि ती व्यवसायात रूपांतर केली.
सिंधुदुर्गातील मालवण देऊळवाडा येथे रहाणाऱ्या एका तरुणाने पोळी (चपाती)बनविण्याचा व्यवसाय सुरू केलाय.या तरुणाचे नाव चिदानंद पवार असून त्याच शिक्षण डिप्लोमा मेकॅनिकल्स झाले आहे.सुरुवातीला एका खाजगी कंपनीत दोन वर्षे काम केले त्यानंतर कोरोना आला आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं.लॉकडाऊन झाल्यामुळे संपूर्ण कंपनी बंद पडली.त्यानंतर जसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला सुरुवात झाली तशी कंपनीने माणसं कामाला घ्यायला सुरुवात केली परंतु पूर्वी दिला जायच्या पगारापेक्षा पगार हातात कमी यायला सुरुवात झाली होती. तुटपुंज पगारामध्ये आपलं काही होऊ शकत नाही या विचारातून चिदानंद पवार या तरुणाने पोळी (चपाती) बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.आजरोजी हा व्यवसाय सुरळीत चालू आहे.हा व्यवसाय सुरू करून दोन वर्षे पूर्ण झाली आहे.
चिदानंद पवार याच शिक्षण डिप्लोमा मेकॅनिकल्स हे कोल्हापूर येथे 2017 साली पूर्ण झालं त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी देखील केली परंतु नोकरी करून फारसा पगार मिळत नव्हता,याची खंत पवार यांना होती.म्हणून स्वतःचा चपाती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.मशीनच्या सहाय्याने दिवसाला गव्हाच्या पिठाच्या 50 किलोच्या चपात्या बनवल्या जातायत.किंवा पर्यटन हंगाम असेल त्यावेळी 150 ते 200 कोलो पर्यत चपात्या बनवल्या जातात.सध्या या चपात्या पॅकिंग करून कुडाळ,मालवण, कणकवली, या ठिकाणी पाठवल्या जातात.तसेच जिल्हा बाहेर मुंबई, तुळजापूर या ठिकाणी देखील पाठवलं जातात.
पवार म्हणतोय की,जरी मी या व्यवसायात नवा जरी असलो तरी मला नोकरी पेक्षा एक समाधान आहे.आणि या व्यवसायातुन हळूहळू प्रगती होईल अशी अपेक्षा वाटत आहे.भविष्यात हा माझा व्यवसाय अधिक बहरेल अशी आशा आहे.या चपात्या बनविण्यासाठी रॉ मटेरियल आणावं लागत.तसेच पवार यांच्यां हाताखाली 6 महिला कामगार आहेत.त्यांनाही पगार वेळच्या वेळी दिला जातो.आणि यातून इतर खर्च वजा करून पवार यांना 50 ते 60 हजार रुपये महिन्याला मिळतात असे पवार सांगत आहे.जरी मला यातून कमी फायदा होत असला तरी मी समाधानी आहे.