नीट परीक्षेसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर

0
127

सिंधुदुर्ग – बारावी नंतरच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशासाठी महत्वाची असलेली “नीट” परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना यापुढे सिंधुदुर्ग जिल्हयाच्या बाहेर जावे लावणार नाही.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मागणी वरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सूचनेनुसार भारत सरकारच्या शिक्षण विभागाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयासाठी स्वतंत्र नीट केंद्र जाहीर केली आहेत.

सिंधुदुर्ग 3120,आणि रत्नागिरी 3121 क्रमांकाची दोन केंद्रे महाराष्ट्र राज्यात वाढविण्यात आली आहेत.या पूर्वी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना ही नीट ची परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत जावे लागत होते.

आता ही परीक्षा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही केंद्रावरून देता येणार आहे. नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हात नाही.त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या लक्षात आणू दिले होते.

तसा पत्रव्यवहार भारत सरकारच्या शिक्षण विभागाला नामदार नारायण राणे यांनी केला होता.ना.नारायण राणे हे शैक्षणिक सोयी सुविधांसाठी नेहमीच आग्रही असल्याने त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र नीट केंद्रे दिली जावीत अशी मागणी केली होती.

त्यानुसार केंद्र सरकारने ही दोन्ही नीट केंद्रे जाहीर केली आहेत. भारत सरकारचे मंत्री होताच गेल्या अनेक वर्षा पासूनची विध्यार्थी पालकांची मागणी नारायण राणे यांनी सोडविलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here