21.4 C
Panjim
Wednesday, January 26, 2022

निसर्ग चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका लाखोंची हानी, किनारी भागात पाउस थांबला

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – निसर्ग चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्गतही बसला. जिल्हय़ात अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. वादळासह मुसळधार पाऊसही सर्वत्र कोसळला. 24 तासांत जिल्हय़ात 71.87 मि. मी. च्या सरासरीने एकूण 575 मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये मालवण तालुक्यात सर्वाधिक 110 मि. मी., तर वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी 24 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खासगी मालमत्तेची लाखोंची हानी झाली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.

सात तालुक्यांत नुकसान

जिल्हय़ात कणकवली तालुक्यात डामरे येथे विनायक पारकर यांच्या राहत्या घरावर झाड पडून नुकसान झाले. तळवणे येथे झाडे पडून तीन घरांचे नुकसान झाले. वेंगुर्ले तालुक्यात नारायण मेस्त्री (रा. मातोंड) यांच्या घरावर झाड पडून 15 हजार रुपयांचे तर गोपाळ गावडे (रा. वजराट) यांच्या घरावर झाड पडून 4 हजार रुपयांचे नुकसान झाले. कुडाळ तालुक्यात विजय नाईक (रा. मळेवाड) यांच्या घराचे पत्र उडून 2 हजाराचे नुकसान झाले. मालवण तालुक्यात आचरा येथील सुरेश परब यांच्या घराचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. आचरा बागवाडी येथे घरावर झाड पडून सुदेश सारंग यांच्या घरासमोरील पत्र्यांच्या शेडचे नुकसान, रत्नप्रभा सावंत (तळगाव-काठापूरवाडी) यांच्या घरावर झाड पडून नुकसान, दीपक पाटणकर (चिंदर-भटवाडी) यांच्या घरावर झाड पडून नुकसान, देवगड तालुक्यात संतोष परब यांच्या घरावर माडाचे झाड पडून 1 लाख 10 हजाराचे नुकसान, राजेंद्र लहू उपानेकर (रा. तांबळडेग), शुभांगी बागवे (रा. पोयरे) तसेच वैभवाडी तालुक्यात सुभान नवलू यांच्या घरावर झाड पडून नुकसान, प्रणाली पर्बते (रा. ऐनारी) यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. दोडामार्ग तालुक्यात कोठेही नुकसान झालेले नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हय़ात कोठेही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यातील झाड पडून वीज खांबाचे नुकसान झाले. दाभोली मोबारवाडी येथील वीज वाहिनीवर झाड पडून नुकसान झाले. करुळ व कळसुली येथे एका घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यात झालेला पाऊस

जिल्ह्यात 24 तासांत पडलेला पाऊस व 1 जूनपासून आतापर्यंत पडलेला पाऊस. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 84 (169), सावंतवाडी 84 (138), वेंगुर्ले 103 (133.6), कुडाळ 67 (100), मालवण 110 (147), कणकवली 25 (55), देवगड 78 (94), वैभववाडी 24 (95) असा आहे.

तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात 86.200 मि. मी. पाऊस झाला, तर देवघर प्रकल्प क्षेत्रात 26.50 मि. मी., कोर्ले-सातंडी क्षेत्रात 29.00 मि. मी. आणि अरुणा प्रकल्प क्षेत्रात 50.20 पाऊस झाला आहे.

जिल्हय़ातील पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा

जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती प्राप्त झाली आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 215.8900 द. ल. घ. मी. पाणीसाठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 48.26 टक्के भरलेला आहे. मध्यम पाटबंधरे प्रकल्प : देवघर – 26.1740, अरुणा – 18.7100, कोर्ले- सातंडी – 22.3200. लघु पाटबंधारे प्रकल्प – शिवडाव – 0.9990, नाधवडे – 1.8179, ओटाव – 1.6476, देंदोनवाडी – 0.2194, तरंदळे – 0.7330, आडेली – 0.0160, आंबोली – 0.2980, चोरगेवाडी – 0.6050, हातेरी – 0.2300, माडखोल – 1.0070, निळेली – 0.3020, ओरोस बुद्रुक – 0.4660, सनमटेंब – 0.4380, तळेवाडी – डिगस – 0.1910, दाभाचीवाडी – 0.5250, पावशी – 0.7240, शिरवल – 0.4400, पुळास – 0.1080, वाफोली – 0.0180, कारिवडे – 0.1160, धामापूर – 0.4710, हरकूळ – 0.4260, ओसरगाव – 0.0160, ओझरम – 0.4240, पोईप – 0.0, शिरगाव – 0.0250, तिथवली – 0.3850, लोरे – 0.0560.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -