नितेश राणेंनी स्वतःच्या वडिलांचा मुख्यमंत्री पदाचा पत्ता कट केला- आमदार वैभव नाईक…

0
140

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे ५ वर्षे सरकार ठिकणार आहे. असे सांगतानाच आमदार नितेश राणे यांनीच राज्याला फडणवीसचं मुख्यमंत्री पाहिजेत असं म्हणून आपल्या वडिलांचा मुख्यमंत्री पदाचा पत्ता कट केला आहे. असे शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले. ते कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकार पडणार या अफवा रविंद्र चव्हाण भाजपचे पक्ष सोडून जाणारे कार्यकर्ते थांबविण्यासाठी पसरवत आहेत. तर नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे म्हटले आहे. नारायण राणेंचा पत्ता मुलानेच कट केला,असा उपरोधक टोला आमदार वैभव नाईक यांनी केला.

जिल्हा बँकेचा अंत्यत चागला कारभार चालू आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी हे काम एकदा भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांना दाखवावे. असे सांगतानाच जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here