26 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

नानार विरोध नसलेल्या जागेत करणार, सिंधुदुर्गात ब्ल्यू फ्लॕग बीच मानांकन मिळवणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात पर्यटनला चालना मिळण्यासाठी संधी आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मालवण इथं जेटीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते पर्यटन विकास आणि संवर्धनासाठी अनेक गोष्टी सुरू आहेत. असेही ते म्हणाले. तर विरोध नसलेल्या जागेत नानार करणार असल्याचेही ते म्हणाले.

स्थानिक भूमीपुत्रांना विश्वासात घेऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणणार जिथे लोकांचा विरोध नसेल तिथेच प्रकल्प येणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.

आमदारांना मोफत घरं मिळण्याबाबत विचारलं असता ही घर मोफत नसून योग्य त्या दरात केवळ मुंबई बाहेर राहणाऱ्या आमदारांना मिळणार आहेत असंही ठाकरे यांनी सांगितले.

पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.

मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. यानंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हाॕटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही ८० वरुन १० वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे. असेही ते म्हणाले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img