धबधब्याखाली पर्यटक अडकल्याचा फोन आला…. बांदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला

0
334

 

तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे अनेक रस्ते,पूल पाण्याखाली गेले आहेत अनेक ठिकाणी संपर्क तुटला आहे .सावंतवाडी येथे 40 ते 50 पर्यटकांचा ग्रुप धबधब्याखाली अडकल्याने मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता पण पोलिसांना सतर्कता बळगत या सगळ्या प्रकारांची सुखरूप सुटका करण्यात यश आला आहे पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टाळला असून सुदैवाने हे सगळे पर्यटक सुखरूप बचावले आहेत. सावंतवाडी तालुक्यात मौजे- घारपी गावालगत हा धक्कादायक प्रकार घडला होता.

घारपी येथे 40 ते 50 लोक धबधब्या खाली अडकून पडले बाबत डायल 112 पोलीस प्रणाली वर कॉल आला होता. बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांनी तात्काळ सूत्र हलवली व आपल्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी PSI समीर भोसले व पोलीस ठाण्यातील 8 अंमलदार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी गेले. मौजे- घारपी गावालगत असणाऱ्या घारपी ते असनिये रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने म्हापसा गोवा येथून पर्यटनासाठी आलेले 24 लोक त्यांच्या गाडीसह अडकलेले होते. त्यांना त्या ठिकाणावरून सुरक्षितरित्या काढून त्यांच्या घरी रवाना करण्यात आले आहे. बांदा पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे त्मोठा अनर्थ टाळला आहे

दरम्यान सावंतवाडी तालुक्यात पावसाचे थैमान सुरू आहे मुख्य रस्ता न्हावेली धाउसकरवाडी ते मातोंडपेंडुर नदीवरील पूल मागील 3/4 दिवस पाण्याखाली
त्यामुळे जन संपर्क तुटला आहे. तुटून पडलेल्या विद्युत भारीत वाहिन्यांमूळे अनेक ठिकाणी गुरांचा मृत्यू होत आहे. ओटवणेत एका युवकाचा बळी गेला. हे सर्व कधी थांबणार व याला कोण जबाबदार प्रशासनाने याबाबत गांभीर्याने निर्णय घेणे अपेक्षित असं मत येथील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हिरण्यकेशी नदीवरी गडहिंग्लज चंदगड राज्यमार्गांवरील भडगाव पुलावर पाणी असल्याने हा मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.. पर्यायी मार्ग गडहिंग्लज – बेलगुंदी -इंचनाळ -गजरगाव – महागाव – नेसरी या मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मांडूकली गावात रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर गगनबावडा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.कोल्हापूर ला जाण्यासाठी फोंडा घाट मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध आहे

दरम्यान सध्या पावसाचा अलर्ट असल्याने सद्यस्थितीत तात्पुऱत्या स्वरूपात वर्षा पर्यटनावर बंदी घालण्यात यावी व आंबोली घाटात संपूर्ण रस्त्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची दाट शक्यता असल्याने पर्यटकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो, घाटात सध्या रिफ्लेकटरची खूप आवश्यकता आहे. दरडग्रस्त भागात धोकादायक इशारे फलक हवेत.रिफ्लेकटर नसल्याने व धुक्यात स्पष्ट दिसत नसल्याने जीवितहानी व अपघात घडण्याची भीती येथील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आले आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार प्रशासनाकडून गांभीर्याने करण्यात यावा अशी मागणी आता स्थानिकांकडून होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here