24 C
Panjim
Thursday, December 8, 2022

देवगडसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू करा तालुक्याला कोवीड निधीची व्यवस्था करा पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करणार संदेश पारकर यांची ग्वाही

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

देवगड: देवगड ग्रामीण रुग्णालय, सीएससी सेंटर संदर्भात पाहणी केल्यानंतर तहसीलदार पातळीवर बैठक घेतली. देवगडमध्ये कोरोणा रुग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची व्यवस्था नाही. देवगड मधील रुग्णांवर तेथेच उपचार व्हावेत यासाठी येथे अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच देवगडसाठी स्वतंत्र किविड निधीची व्यवस्था करावी अशी मागणी आपण पालक मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.
श्री. पारकर यांनी देवगड येथील कोबीड केअर सेंटरला भेट दिली व पाहणी केली. 100 बेडच्या याकोबीड सेंटर मध्ये 80 ते 85 रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. मात्र या ठिकाणी योग्य प्रकारचे जेवण, गरम पाणी उपलब्ध होत नाही. तसेच कचराही साठलेला आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. आरोग्य विभागाकडून तातडीने सिलेंडर व शेगडीची व्यवस्था करून गरम पाणी देण्यात येईल. नगरपंचायतिकडून कर्मचारी नेमून त्याची साफसफाई करणे तर आरोग्य विभाग व तहसीलदार यांच्या मार्फत योग्य पूरक पोषण असलेला आहार देण्यात येईल. यासाठी सध्या एका बचत गटाकडून जेवण तयार केले जाते त्यासाठी अजून 1-2 बचत गट वाढवण्यात येतील असे सांगण्यात आले. कोबीड सेंटर च्या ठिकाणी सोलर सिस्टिम आहे. मात्र ती बंद असल्याने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली. ही सिस्टीम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
देवगड तालुक्यात एक लाख पाच हजार एवढी लोकवस्ती आहे. मात्र येथे एकही ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड नाही. त्यामुळे सर्वांनाच कणकवली किंवा अन्य ठिकाणच्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे बेडची उपलब्धता होत नाही. याकरिता देवगड ग्रामीण रुग्णालयात कोबीड हॉस्पिटल सुरू करून पाच व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड तातडीने उपलब्ध करण्याची गरज आहे. देवगड तालुक्यात फिजिशियन नसल्याने तेथे रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर होत नाही. त्यादृष्टीने तातडीने फिजिशियन नियुक्त करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री, खासदार, आमदार जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. पारकर म्हणाले. देवगड येथे इतर रुग्णालयात प्रमाणेच ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची गरज असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाच देण्यात आले आहेत. तेथे अजून सहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देवगड तालुक्याला याची गरज आहे. त्यादृष्टीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पारकर म्हणाले. या सेंटरमध्ये संध्या दोन जम्बो सिलेंडर आहेत व 15 छोटे सिलेंडर आहेत. या ठिकाणी तेरा जम्बो सिलेंडर ची गरज आहे तर छोटे सिलेंडर येथे भरून मिळत नसल्याने कोल्हापूरला पाठवावे लागतात. 15 पैकी 13 रिकामी झालेले असून या दृष्टीने ही व्यवस्था होण्याची गरज आहे. या सेंटरमध्ये पाच स्टाफ नर्स व तीन स्वीपर कार्यरत आहेत अजून सात स्टाफ नर्सची आणि तीन स्वीपरची गरज आहे. त्यासाठी आउटसोर्सच्या माध्यमातून हे कर्मचारी, डॉक्टर, दोन होमिओपॅथी डॉक्टर नियुक्त करण्याची गरज आहे. देवगड येथे अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायत मार्फत व्यवस्था करण्यात येत असली तरीही एकूण व्यवस्थेवर ताण येत असल्याने तेथे विद्युतदाहिनी मिळण्याची गरज आहे. तसेच देवगड साठी अजून दोन रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही आपण करणार असल्याचे श्री. पारकर म्हणाले. देवगड तालुक्याच्या एकूण 1 लाख 5 हजार लोकसंख्येचा विचार करता 33 हजार लोकसंख्या 45 वर्षावरील तर 32 हजार 18 ते 44 वयोगटातील आहे. मात्र आतापर्यंत केवळ 19 हजार जणांना पहिला व दोन हजार जणांना दुसरा डोस मिळाला आहे. हे लसीकरण अत्यंत अल्प असून येथे जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची गरज आहे. देवगड मधील रुग्णांवर देवगड येथे उपचार होण्याच्यादृष्टीने कोवीड हॉस्पिटल सुरू करण्याबरोबरच, फिजिशियन आवश्यक स्टाफ भरण्यात यावा.तसेच स्वतंत्र कोबीड निधीची देवगडसाठी व्यवस्था करण्यात यावी. यासाठी आपण पालकमंत्री, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री. पारकर म्हणाले. तसेच खुडी येतील प्राथमिक आरोग्य केंद्र ही लवकरात लवकर सुरू करावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री पारकर यांनी सांगितले.
या आढावा बैठकीला तहसीलदार मारुती कांबळे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री. गवाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोंडके, डॉ. भगत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, रवींद्र जोगल, संतोष उर्फ बुवा तारी, जी. टी. पेडणेकर, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles