कलिंगडाला ‘भाव’ मिळेना, सिंधुदुर्गात हजारो टन कलिंगड पडून

0
100

 

सिंधुदुर्ग – कलिंगडाचे अतिरिक्त उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या प्रमाणेच गतवर्षी भाव मिळत नाही असे चित्र आहे. मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बदलते हवामान आणि अस्थिर बाजारभावामुळे कलिंगडासारख्या ९० दिवसांत पैसे मिळवून देणाऱ्या पिकाकडूनही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

कसाल मधील निलेश गावडे या तरुण युवकाने गडमट या परिसरामध्ये सात एकर मध्ये कलिंगडाची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे. गेल्यावर्षी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वच मार्केट बंद असल्याने विक्रीला मोठा ब्रेक लागला. त्यामध्ये ७ लाखाच नुकसान झालाय , एवढं मोठं नुकसान भरून कस काढायचं हा समोर प्रश्न उभा राहिलाय , अक्षरश: चार ते पाच एकरचे प्लॉट कलिंगड जमीनदोस्त झाले आहेत.

दरवर्षी ७ ते ८ एकर मध्ये कलिंगड या पिकाची लागवड घेत असून , गतवर्षी देखील त्याच प्रमाणे ७-८ एकर मध्ये कलिंगड या पिकाची लागवड केली. गेल्या वर्षी मात्र कोरोना च्या महामारी मुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परिणाम: गतवर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल या हेतूने कलिंगडाचे पीक घेतले , मात्र यावर्षी देखील कोरोना महामारीने अक्षरश: त्यावर पाणी सोडले.

दरवर्षी प्रत्येकी एक एकर मागे १ लाख रुपये खर्च येतो. मल्चिंग पेपर , ठिबक , पाईप लाईन , खते , मजुरी पाहता हा खर्च मोठा होतो. परिणाम: सात ते आठ एकरामध्ये सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आता ही खतं आणि कीटकनाशकं विकत घ्यायची तर शेतकऱ्याकडे सगळी रक्कम रोखीत पाहिजे. कलिंगडासाठी ह्या गोष्टी कुणीच उधारीवर देत नाहीत.

गतवर्षी देखील नफा होईल अशी निलेश यांना आशा होती आणि त्यांनी मार्च ते जूनच्या काळात तीन टप्प्यात फळ हाती येईल. अशा पद्धतीने सात ते आठ एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली.साधारणपणे एका एकरात १५ टन कलिंगड होतं. यातली १० टन तरी एकदम सुबक, नितळ, वजन आणि आकारात सारखी आणि कसलेही ओरखडे नसणारी असतात. सिंधुदुर्ग , गोवा , रत्नागिरी , कोल्हापूर या ठिकाणी आमचे पिकाची विक्री होते. निलेश यांनी सांगितले.

लॉकडाऊन च्या आधी ८ ते ९ रुपये प्रति कलिंगड भाव मिळत असे. लॉकडाऊन मध्ये तर १ ते २ रुपये भाव मिळतो आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापारीही मिळत नाही. शेतीसाठी केलेला खर्च प्राप्त व्हावा या कारणाने १ ते २ रुपयांनी व्यापाऱ्यांना कलिंगड द्यावे लागत आहे.

कोविड-१९ चं संकट आलं नव्हतं तेव्हाही लागवडीचा वाढता खर्च, भावातला चढउतार यामुळे कलिंगडाची शेती बेभरवशाचीच होती आणि आता सगळंच ठप्प झाल्यानंतर शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांसाठी यंदाचा हंगाम आतबट्ट्याचा ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here